मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आता हेच पाहायचं बाकी होतं! नवरा-नवरीचं स्टेजवरील ते कृत्य पाहून नेटिझन्सनी डोक्याला लावला हात

आता हेच पाहायचं बाकी होतं! नवरा-नवरीचं स्टेजवरील ते कृत्य पाहून नेटिझन्सनी डोक्याला लावला हात

लग्नात नवरा-नवरी असं काही करतील असं कुणालाच वाटलं नव्हतं.

लग्नात नवरा-नवरी असं काही करतील असं कुणालाच वाटलं नव्हतं.

लग्नात नवरा-नवरी असं काही करतील असं कुणालाच वाटलं नव्हतं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 20 डिसेंबर : लग्न (Wedding video) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात अनमोल असा क्षण. त्यामुळे आपलं लग्न हटके करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. नवरा-नवरी (Bride groom video) एकमेकांना सरप्राईझ देत असतात. लग्नातील सरप्राईझचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नवरा-नवरीने लग्नात जे केलं ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

लग्नात नवरा-नवरी एकमेकांसोबत नजरेने बोलताना, गालातल्या गालात हसताना दिसतात. त्यांच्यातील रोमँटिक क्षण यावेळी पाहायला मिळतात. पण सध्या व्हायरल होत असलेल्या लग्नाच्या या व्हिडीओत नवरा-नवरी असं काहीच करताना दिसलं आहे. त्यांनी सर्वांसमोर असं काही केलं ज्याचा कधी कुणी विचारही केला नसेल.

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी स्टेजवर तर आहेत. पण ते स्टेजवर उभे नाहीत किंवा स्टेजवर खुर्चीवर बसलेले नाहीत. तर चक्क स्टेजवर पुशअप्स मारताना दिसत आहेत.

हे वाचा - VIDEO - मित्रांनी नवरीला दिलं असं गिफ्ट; पाहताच नवरदेवाच्या चेहऱ्याच रंगच उडाला

wedding_couple_diaries इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून बहुतेक नेटिझन्सनी डोक्याला हातच लावला आहे. आता हेच बघायचं बाकी होतं, अशीच कमेंट अनेक नेटिझन्सनी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by aana arora (@aan4490)

याआधी एका नवरीचाही पुशअप्स मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओत पाहू शकता, नवरी पूर्ण तयार झाली आहे. तिने दागिने घातले आहेत आणि सुंदर असा लेहंगाही घातला आहे. पण अशी तयार होऊन ती एखाद्या बाहुलीसारखी किंवा इतर नवरीसारखी लाजत मुरडत किंवा स्वतःला आरशात पाहत बसली नाही तर तिने आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवले आणि पुशअप्स मारायला सुरुवात केली.

हे वाचा - अरारारा खतरनाक! पठ्ठ्याने कमालच केली; Driving Video पाहून भलेभले पडले गार

नटूनथटून आपल्याच लग्नाच्या दिवशी नवरीने पुशअप्स मारल्या. त्यातही विशेष म्हणजे लग्नाचा लेहंगा म्हटला की तो इतका जड असतो की सावरत साधं चालणंही शक्य होत नाही. पण याच लेहंग्यावर ही नवरी पुशअप्स मारताना दिसली. त्यामुळे तिचं जास्तच कौतुक वाटतं आहे.

First published:

Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video