नवी दिल्ली, 4 जानेवारी : मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांशिवाय लग्नात (Wedding) मजाच येत नाही. लग्नाच्या दिवशी वर-वधूचा थाटच वेगळा असतो. सर्वांचं लक्ष वर-वधूकडे असतं. त्यांनी कोणते कपडे घातले...त्याचं रंग..मेकअप सर्वच लक्ष देऊन पाहिलं जातं. लग्नात सर्वजण वर-वधूसाठी भेटवस्तू आणतात. परंतू आपण असं कधी ऐकलं आहे का की पाहुण्यांनी दिलेल्या लग्नाच्या भेटवस्तूमुळे एखाद्याने स्वत:च लग्न रद्द केलं? ही बातमी वाचून तुम्हीही गोंधळात पडाल, पण हे पूर्णपणे सत्य आहे.
मनासारखं गिफ्ट मिळालं नाही म्हणून रद्द केलं लग्न
मनासारखं गिफ्ट मिळालं नाही म्हणून कॅनडामध्ये (Canada) राहणारी सुसन (Susan) हिने आपलं लग्न कॅन्सल केलं. सुसनच्या चुलत बहिणीने तिचं लग्न रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन (Social Media) दिली. त्यानंतर ही बातमी व्हायरल झाली.
हे ही वाचा-VIDEO : भरपावसात हत्तीणीने दिला पिल्लाला जन्म, कुटुंबाने मिळून आनंद केला साजरा
लग्नात पाहुण्यांकडून अशी भेट हवी होती
सुसनने लग्नात पाहुण्यांसमोर रोख रकमेची मागणी ठेवली होती. सुसनला तिच्या लग्नात मिळालेल्या पैशातून 60 हजार डॉलर्स जमा करायचे होते. पण पाहुण्यांनी सुसनच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले आणि सुसनला तिचं लग्न रद्द करावे लागले.
सुसनचा होणारा नव्हरा म्हणतो यासाठी तिचे मित्रपरिवार आणि नातेवाईक जबाबदार
सुसनचा होणारा पती लग्न रद्द झाल्याने खूप दु:खी झाला आहे. त्याचं म्हणणं आहे की, काही कारणांमुळे त्याचं आणि सुसनचं लग्न होऊ शकलं नाही. यासाठी त्याने मित्र आणि कुटुंबीयांना जबाबदार धरलं आहे.
हे ही वाचा-‘Hello, तुमची पत्नी आणि मुलीचा अश्लील Video माझ्याजवळ आहे’; वाचा काय आहे प्रकार
सुसनने सोशल मीडियावर व्यक्त केलं दु:ख
लग्न रद्द झाल्यानंतर सुसन हिने सोशल मीडियावर मनातून भावना व्यक्त केल्या. सुसानने लिहिलं की, 'एकत्र काम करताना आम्ही दोघे प्रेमात पडलो. त्यावेळी आम्ही 14 वर्षांचे होतो आणि मग वयाच्या 18 व्या वर्षी आम्ही साखरपुडा केला. मी वयाच्या 20 व्या वर्षी आई बनले आणि आम्ही एकत्र जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. पण आमच्याकडे लग्न करण्यासाठी फक्त 15 हजार डॉलर्स होते. चांगले लग्न करण्यासाठी आम्हाला 60 हजार डॉलर्सची गरज होती. म्हणून आम्ही आमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगितले की त्यांनी आम्हाला लग्नात गिफ्ट देण्याऐवजी कॅश द्यावी. मात्र कुटुंबीय आणि मित्रांनी असं केलं नाही. या कारणाने आम्ही लग्नचं रद्द केलं.