मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ती मागणी पूर्ण न झाल्यानं भडकली नवरी; स्टेजवरच केलं असं काही की..., पाहा VIDEO

ती मागणी पूर्ण न झाल्यानं भडकली नवरी; स्टेजवरच केलं असं काही की..., पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव एकटाच स्टेजवर उभा आहे. इतक्यात नवरीबाईही स्टेजवर येते. मात्र, ती नाराज असल्याचं दिसतं. यासोबतच तिच्या चेहऱ्यावरही रागही स्पष्ट दिसतो.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : लग्नाच्या कार्यक्रमात नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) भरपूर आनंदात असल्याचं पाहायला मिळतं. मात्र असं न झाल्यास वेगवेगळ्या चर्चांना मंडपातच सुरुवात होते. स्टेजवर उभा असलेली नवरीबाई नाराज दिसली की लग्नात आलेले पाहुणे वेगवेगळे तर्क लावण्यास सुरुवात करतात. जेव्हापर्यंत सगळं स्पष्ट होतं नाही तोपर्यंत या चर्चा सुरूच राहतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) झाला आहे.

VIDEO : लग्नात स्टेजवरच भिडले नवरी-नवरदेव; पाहुण्यांनाही समजेना हसावं की रडावं

लग्नाच्या कार्यक्रमात नवरी आणि नवरदेवाला नाराज पाहण्याची घरच्यांचीही इच्छा नसते. मात्र, असं काही झालंच तर लगेचच त्यांचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न केला जातो. इंटरनेटवर सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही (Angry Bride Video) असंच काहीसं पाहायला मिळतं. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव एकटाच स्टेजवर उभा आहे. इतक्यात नवरीबाईही स्टेजवर येते. मात्र, ती नाराज असल्याचं दिसतं. यासोबतच तिच्या चेहऱ्यावरही रागही स्पष्ट दिसतो.

नवरीला नक्की काय झालं? असा सवाल सगळ्यांच्या मनात होता. त्यामुळे उपस्थित सगळेच हैराण होते. व्हिडिओ पाहून हे समजत नाही, की नवरीला नेमका कोणत्या गोष्टीचा राग आला आहे. मात्र, व्हिडिओचं कॅप्शन वाचल्यावर समजतं, की आपल्या आवडीचं गाणं न लावल्यानं ही नवरीबाई रागवली आहे.

Bungee Jumping करताना दोरी तुटल्यानं महिलेचा मृत्यू, Shocking Video

इन्स्टाग्रामवर नॉमन्स क्लिक नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, आवडीचं गाणं न लावल्यानं रागवली. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Bride, Wedding video