मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रिसेप्शनदिवशीच आपल्या आईला नवरदेवासोबत पाहून नवरीचा हिरमोड; Video Viral

रिसेप्शनदिवशीच आपल्या आईला नवरदेवासोबत पाहून नवरीचा हिरमोड; Video Viral

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Instagram Reels) नवरदेव आपल्या नवरीला सोडून आपली आई आणि नवरीच्या आईसोबत डान्स करताना दिसतो.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 24 ऑक्टोबर : आपल्या लग्नासाठी नवरी आणि नवरदेव खास डान्स (Romantic Dance of Bride and Groom) करण्याचं प्लॅनिंग करतात. एकमेकांना स्पेशल फिल करून देण्यासाठी चांगली चांगली गाणी निवडतात. मात्र, सध्या समोर आलेल्या प्रकरणात नवरीसोबत भलतीच मस्करी झाली. लग्नानंतर रिस्पेशनसाठी (Reception) नवरी अगदी छान सजून पोहोचली. ती आपल्या नवरदेवासोबत डान्स करून खास रिसेप्शनचं प्लॅनिंग करत होती. इतक्यात नवरदेवानं अजब काम केलं.

कायच्या काय! इथे लग्नात पैसे देऊन बोलावले जातात पाहुणे; कारण जाणून व्हाल अवाक

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Instagram Reels) नवरदेव आपल्या नवरीला सोडून आपली आई आणि नवरीच्या आईसोबत डान्स करताना दिसतो. नवरदेव या दोघींसोबतही ठुमके लगावताना दिसतो आणि मध्येच कपल डान्सही करतो. एकसोबत दोघींबरोबर डान्स करत असूनही तो अजिबातही गडबडत नाही. आई आणि सासूदेखील त्याला अगदी चांगल्या पद्धतीनं साथ देतात.

View this post on Instagram

A post shared by Jully Patel (@just.jully)

तिघांचा हा डान्स अगदीच खास आहे. मात्र, हे नवरीबाईला फारसं आवडलं नाही. नवरदेव आपल्यासोबत डान्स करत नसल्यानं नवरीला वाईट वाटतं. मात्र नवरदेवानं नवरीला खास सरप्राईज देण्यासाठी हा डान्स केला होता. रिसेप्शनमध्ये आलेले सर्व पाहुणे या डान्सची मजा घेतात.

VIDEO: आधी लगावले जोरदार ठुमके, मग ढसाढसा रडू लागली नवरी; कारण जाणून व्हाल हैराण

इन्स्टाग्रामवर @just.jully नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, माझ्या लग्नातही असंच झालं तर मी खूप आनंदी होईल. आणखी एका यूजरनं बिचारी नवरी, अशी कमेंट केली आहे.

First published:

Tags: Dance video, Wedding video