मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरीच्या अदांवर वऱ्हाडीही फिदा; बाल्कनीत येत केलं असं काही की सगळेच बघत राहिले, पाहा VIDEO

नवरीच्या अदांवर वऱ्हाडीही फिदा; बाल्कनीत येत केलं असं काही की सगळेच बघत राहिले, पाहा VIDEO

सध्या एक नवरीचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. यात दिसतं, की नवरदेव वरात घेऊन दारात पोहोचताच नवरी बाल्कनीमध्ये उभा राहून त्याला फ्लाईंग किस (Flying Kiss) देते.

  नवी दिल्ली 22 ऑक्टोबर : जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न ठरतं तेव्हा ती आपल्या लग्नाच्या दिवसाची (Wedding Day) आतुरतेनं वाट बघत असते. मुलगादेखील वरात घेऊन आपल्या नवरीबाईच्या घरी जाण्यासाठी अतिशय उत्सुक असतो. लग्नाच्या दिवशी जेव्हा नवरदेव वरात घेऊन लग्नमंडपात पोहोचतो तेव्हा नवरीही त्याला पाहण्यासाठी अतिशय उत्सुक असते. सध्या अशाच एक नवरीचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. यात दिसतं, की नवरदेव वरात घेऊन दारात पोहोचताच नवरी बाल्कनीमध्ये उभा राहून त्याला फ्लाईंग किस (Flying Kiss) देते. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या बहिणीची अजब मागणी; सगळेच हैराण, मंडपातच तुटलं नातं सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव वरात घेऊन दारात येताच नवरी अतिशय उत्साहात दिसते. बाल्कनीत उभा राहून आपल्या नवरदेवाची वाट पाहणारी नवरी आनंदात नवरदेवाला फ्लाईंग किस देते.
  नवरीनं अतिशय सुंदर लेहंगा घातलेला आहे. यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये असलेली नवरीबाई खाली उभा असलेल्या काही लोकांना हाक मारून नवरदेवाला वरती पाहण्यास सांगण्याचा निरोप देते. नवरदेवानं वरती पाहताच नवरी त्याला फ्लाईंग किस देऊ लागते. असली कसली मस्करी हो, लग्नातील गिफ्ट पाहून नवरीसह सर्वजण Shocked! पाहा Video नवरी आणि नवरदेवाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लोकांच्या भरपूर पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर विटी वेडिंग नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, की नवरीबाई लपूर लपून वरातीचा वाट बघत होती, ती आपल्या नवरदेवाच्या आगमनासाठी उतावळी झाली होती. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Video viral, Wedding video

  पुढील बातम्या