मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नादिवशीच नवरीबाईने घेतला मोठा निर्णय; सप्तपदीआधी दिली 'ही' परीक्षा; पाहा VIDEO

लग्नादिवशीच नवरीबाईने घेतला मोठा निर्णय; सप्तपदीआधी दिली 'ही' परीक्षा; पाहा VIDEO

लग्न करण्याआधी नवरीने केलं महत्त्वपूर्ण काम.

लग्न करण्याआधी नवरीने केलं महत्त्वपूर्ण काम.

लग्न करण्याआधी नवरीने केलं महत्त्वपूर्ण काम.

  • Published by:  Priya Lad

अहमदाबाद, 23 नोव्हेंबर : लग्न (Wedding Video) म्हटलं की नववधूंची ड्रेस, मेकअप याची तयारी सुरू असते. त्याचाच उत्साह त्यांच्यात असतो. पण सध्या अशा एका नवरीचा व्हिडीओ (Bride video) सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल होतो जिला यापेक्षाही सर्वात महत्त्वाची वाटते ती परीक्षा. लग्नाच्या दिवशी सप्तपदी घेण्याआधी नवरीबाईने  एक परीक्षा दिली आहे (Bride gave exam on wedding day). तिच्यासाठी लग्नाआधी ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे, हेच तिने दाखवून दिलं आहे.

गुजरातच्या राजकोटमधील एक नवरी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या नवरीचा परीक्षा देतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. लग्नाच्या दिवशीच नवरीची परीक्षा होती. त्यामुळे लग्नमंडपाऐवजी ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. सप्तपदी घेण्याआधी तिने परीक्षा दिली, त्यानंतर तिने लग्न केलं.

शिवांगी बगथारिया असं या नवरीचं नाव आहे. लग्नाच्या दिवशी तिची युनिव्हर्सिटीची परीक्षा होती. त्यामुळे लग्नाचा ड्रेस, दागिने घालून नटूनथटून ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. नवरी बनूनच तिने परीक्षा दिली.

हे वाचा - पैसे नाही पण प्रश्नांची योग्य उत्तरं द्या आणि ई-रिक्षातून फ्रीमध्ये प्रवास करा

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार शिवांगी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत सकाळी शांती निकेतन कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी केली. बीएसडब्ल्यूची (बॅचलर ऑफ सोशल वर्क) पाचव्या सत्राची ही परीक्षा होती.  शिवांगीने सांगितलं, जेव्हा लग्नाची तारीख ठरली तेव्हा परीक्षेचं वेळापत्रक जारी झालं नव्हतं. लग्नाची तारीख, मुहूर्त आणि परीक्षेची वेळ लागोपाठ होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबाने आपल्या या निर्णयाला पाठींबा दिला.

हे वाचा - पतीला घटस्फोट देत पाळीव कुत्र्यासोबत केलं लग्न; महिलेची अजब Love Story

विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांनी या नवरीबाईचं कौतुक केलं आहे. काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी तिने हे प्रसिद्धीसाठी केल्याचीही प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Bride, Viral, Viral videos, Wedding, Wedding video