मराठी बातम्या /बातम्या /Viral /भारतीय तरुणावर जडला जीव, 5000 किलोमीटरवरून आली परदेशी वधू

भारतीय तरुणावर जडला जीव, 5000 किलोमीटरवरून आली परदेशी वधू

ती होती 5000 किलोमीटर लांब. तो होता भारतात. दीड वर्षांची प्रतिक्षा संपली आणि तिने त्याच्याकडे धाव घेतली.

ती होती 5000 किलोमीटर लांब. तो होता भारतात. दीड वर्षांची प्रतिक्षा संपली आणि तिने त्याच्याकडे धाव घेतली.

ती होती 5000 किलोमीटर लांब. तो होता भारतात. दीड वर्षांची प्रतिक्षा संपली आणि तिने त्याच्याकडे धाव घेतली.

गुंटूर, 30 डिसेंबर: भारतीय तरुणावर (Indian Youth) जीव जडलेल्या एक परदेशी तरुणीनं (Foreigner girl) थेट आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) येऊन त्याच्याशी पारंपरिक पद्धतीनं विवाह (Traditional marriage) केला. अर्थात, दोघांचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा (Engagement) झाला होता. मात्र भारतात आलेली परदेशी नवरी आणि तिनं पारंपरिक पद्धतीनं भारतातील तरुणाशी केलेलं लग्न ही घटना देशभर चांगलीच गाजली. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या जोडप्यानं घरच्यांची परवानगी मिळवण्यासाठी बरीच प्रतीक्षा केली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आणि दोघं लग्नगाठीत बांधले गेले. 

अशी झाली ओळख

मूळचा आंध्रप्रदेशमधील असणारा मधू संकिरथ हा काही कामानिमित्त टर्कीमध्ये राहत होता. त्यावेळी टर्कीतील गिजेम नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली. दोघंही एकाच संस्थेत आणि एकाच विभागात काम करत होते. मधूचा मदत करण्याचा आणि खेळकर स्वभावामुळे त्याची गिजेमशी मैत्री झाली आणि काही दिवसांतच या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही या प्रेमाचं रुपांतर लग्नात करावं, असा निर्णय घेतला आणि त्यासाठी आपले विचार घरच्यांना सांगितले.

घरच्यांनी केला विरोध

मधूच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. परदेशातील तरुणी आम्हाला सून म्हणून नको, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र घरच्यांची समजूत काढण्याचा फैसला दोघांनी केला आणि एकमेकांसोबत एंगेजमेंट केली. 2019 साली दोघांचा साखरपुडा पार पडला आणि 2020 मध्ये त्यांना लग्न करायचं होतं. मात्र नेमका त्याच काळात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोघंही आपापल्या देशांत अडकून पडले. 

हे वाचा -

यंदा पार पडलं लग्न

जुलैमध्ये विमानसेवा सुुरु झाल्यानंतर मधू टर्कीला गेला आणि तिथं दोघांनी तिथल्या पद्धतीनं लग्न केलं.

त्यानंतर दोघंही भारतात आले आणि नुकताच दाक्षिणात्य पद्धतीनं त्यांचा विवाहसोहळा पार पडला. पारंपरिक तेलुगु पद्धतीनं झालेल्या या लग्न सोहळ्यासाठी जवळचे निमंत्रित उपस्थित होते. सर्वांनी परदेशी वधू आणि देशी वराला भरभरून आशीर्वाद दिले. 

First published:

Tags: Andhra pradesh, Bridegroom, Marriage, Turkey