Home /News /viral /

वाळवंटात नवरदेवाचा हात पकडून धावणं भोवलं; नवरीसोबत नको ते घडलं, Video Viral

वाळवंटात नवरदेवाचा हात पकडून धावणं भोवलं; नवरीसोबत नको ते घडलं, Video Viral

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव एकमेकांचे हात पकडून उभा आहेत. हा व्हिडिओ त्यांच्या पाठीमागे असलेल्या कोणीतरी शूट केला आहे, त्यामुळे वधू-वराचा चेहरा दिसत नाही.

  नवी दिल्ली 23 मे : मित्रांसोबत मस्ती करण्याची मजाच वेगळी असते. विशेषतः समोरचा व्यक्ती तुमचा अगदी खास मित्र असेल, तर मजा आणखीच वेगळी. मित्रांसोबत मस्ती आणि मस्करीचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहायला मिळतात. कधीकधी ते खूप भावनिक असतात आणि कधीकधी ते खूप मजेशीर देखील असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर मित्रांचा नाही तर एका नवरी आणि नवरदेवाच्या मस्तीचा अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Bride Groom Funny Video) होत आहे. सिंहासोबत करत होता मस्ती; भडकलेल्या जंगलाच्या राजाने हात जबड्यात पकडला अन्.., Shocking Video व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव एकमेकांचे हात पकडून उभा आहेत. हा व्हिडिओ त्यांच्या पाठीमागे असलेल्या कोणीतरी शूट केला आहे, त्यामुळे वधू-वराचा चेहरा दिसत नाही. हे दोघंही कुठल्यातरी उताराच्या जागेवरून धावत आहे. संपूर्ण जागा कच्ची जमीन आहे तसंच धूळ आणि मातीने भरलेली आहे. हे पाहून जाणवतं की जणू वधू आणि वर वाळवंटात आहेत. काही लोक समोरील बाजूस उभा आहेत, जे या दोघांचा व्हिडिओ बनवत आहेत. पण या व्हिडिओमध्ये पुढं जे काही होतं, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
  व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव उतारावरुन खाली धावू लागतात, मात्र उतार तीव्र असल्याने खाली येताना नवरदेव जोरात धावू लागतो. नवरीनेही नवरदेवाचा हात पकडलेला असतो. अशात नवरदेव धावू लागताच खाली जाताच नवरीचा तोल जातो आणि ती धाडकन तोंडावर आपटते आणि नवरदेव धावतच पुढे निघून जातो. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. महिलेला पार्टीत आमंत्रित न करणं सहकाऱ्यांना भोवलं; द्यावी लागली 72 लाखाची नुकसान भरपाई हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. bridal_lehenga_designn नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही शेअर केला गेला आहे. व्हिडिओ आतापर्यंत ५० हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. लोकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bridegroom, Wedding video

  पुढील बातम्या