नवी दिल्ली 27 डिसेंबर : लग्नाच्या कार्यक्रमात अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्या पाहूनच सगळे हैराण होतात. नवरी आणि नवरदेवाला आपली एन्ट्री अतिशय दिमाखात आणि अनोख्या पद्धतीने व्हावी असं वाटत असतं. मात्र अनेकदा याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळतं. नवरदेव आपल्या वेगळ्या अंदाजाने नवरीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या नवरदेवाने आपल्यासाठी काहीतरी खास करावं, अशी नवरीचीही इच्छा असते. सध्या एका नवरदेव नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Bride Fall on Stage).
व्हिडिओमध्ये (Viral Video of Bride and Groom) दिसतं की नवरदेवाने अतिउत्साहात असं काही केलं की नवरीबाईची सर्वांसमोरच फजिती झाली. व्हिडिओ पाहून तुम्हीही विचारात पडाल की नवरदेवाने नेमकं कशासाठी हे सगळं केलं असेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Wedding Video) दिसतं की नवरदेव स्टेजवर उभा असतो. इतक्यात नवरी अतिशय सुंदर अंदाजात तिथे एन्ट्री करते. जेव्हा ती स्टेजजवळ आली, तेव्हा तिला वरती घेण्यासाठी नवरदेवाने हात पुढे केला. काही वेळानंतर नवरदेवाने नवरीचा हात जोरात खेचला. यामुळे नवरीबाई धाडकन स्टेजवर जाऊन कोसळली.
View this post on Instagram
हे दृश्य पाहून मागे उभा असलेले लोकही हैराण झाले. नवरदेवाने सर्वांसमोरच नवरीला तोंडावर पाडलं. मागेच उभा असलेल्या नवरीकडच्या एका पाहुणीने नवरीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ती पडली होती. नवरीची ही अवस्था पाहून मागे उभा असलेले लोकही हैराण झाले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या.
एका यूजरने लिहिलं, की स्टेजवर चढताना नवरीने लक्ष द्यायला हवं होतं आणि नवरदेवाने तिला जोरात ओढण्याऐवजी आरामात वरती घ्यायला हवं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ भूतनी के मीम नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओ अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Wedding video