Home /News /viral /

लग्नात नवरीनं काळा गॉगल घालून बुलेटवरून मारली एंट्री; पाहा VIDEO

लग्नात नवरीनं काळा गॉगल घालून बुलेटवरून मारली एंट्री; पाहा VIDEO

आपलं लग्न (Special Marriage) खास असलं पाहिजे असं अनेकांना वाटतं, अशाच एका लग्नात नवरीनं मंडपात काळा गॉगल घालून बुलेटवरून एंट्री मारली त्यामुळं सर्वजण बघतच राहिले. तिचा भाऊ बुलेटराजा बनून आपल्या लाडक्या बहिणीला मंडपात घेऊन आला.

    बरेली, 25 मे : लग्नाविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मंत असतात, लग्नामध्ये काय करायचं याचं अनेकजण आधीच प्लॅनिंग करतात, अलिकडं कोरोनामुळं लग्नांमधील (Marriage in Corona) उत्साहावर पाणी फेरलं जात असलं तरी अनेक ठिकाणी लोक आहे, त्या स्थितीत लग्न कसं यादगार बनवता येईल याचा विचार करत असतात. आपलं लग्न (Special Marriage) खास असलं पाहिजे असं अनेकांना वाटतं, अशाच एका लग्नात नवरीनं मंडपात काळा गॉगल घालून बुलेटवरून एंट्री मारली त्यामुळं सर्वजण बघतच राहिले. तिचा भाऊ बुलेटराजा बनून आपल्या लाडक्या बहिणीला मंडपात घेऊन आला. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील हे लग्न शहरात चांगलंच चर्चेत आहे. नवरीनं लग्नात मारलेल्या एन्ट्रींची परिसरात चर्चा आहे. दरम्यान, बरेलीच्या सिकलापूर मोहल्ल्यात राहणाऱ्या या नंदिनीला एकूण सात भाऊ आहेत. विशेष म्हणजे यातील पाच जण बॉडी बिल्डर असून दररोज जीममध्ये घाळ गाळतात. तर एक भाऊ शिक्षक असून दुसरा ड्रायव्हर आहे. हे वाचा - पैसे नसल्यानं सलमान खाननं या जिममधून केली बॉडी बिल्डिंगला सुरुवात; वर्षाला होती 60 रुपये फी हे वाचा - धक्कादायक : पुण्यात हत्या झालेल्या 75 वर्षीय वृद्धेवर हत्येपूर्वी आणि नंतरही लैंगिक अत्याचार, पोलिसांनी 24 तासांत असा लावला छडा सात भावांची एकुलती एक बहीण असल्यानं तिच्या लग्नाची जोरदार तयारी त्यांनी केली होती. कोरोना काळात डीजे साऊड सिस्टम वाजवण्यास बंदी आहे, मात्र बहिणीच्या आनंदासाठी कमी आवाजात गाणी लावून सर्वांनी मौजमजा केली, लग्नासाठी सर्व विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सिकलापूरहून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या आलमगिरीगंज येथून लग्नाची वरात निघाली होती आणि ती सिकलापूरला पोहचली, त्यावेळी काळा कुर्ता घातलेला तिचा भाऊ बुलेटराजा बनला आणि बहिणीला बुलेटवरून घेऊन येत लग्न संस्मरणीय बनवलं. या एंन्ट्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Marriage, Uttar pradesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या