ट्रेंडिग दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांशेजारी बसले आहेत. दोघंही खूप आनंदात आहेत. नवरीबाई उत्साहात नवऱ्याकडे पाहत काही इशारे करते. तेव्हा नवरदेव तिला पाहतच राहतो. तू खूप सुंदर दिसते आहेस असं तो तिला हातानेच खुणावतो. त्यानंतर आपल्या हृदयावर हात ठेवून चक्कर येण्याचं, आपला तोल जात असल्याचं नाटक करतो. जणू काही नवरीला पाहून त्याला हार्ट अटॅकच आला असं तो भासवून देतो. हे वाचा - नवरीला पाहताच सुटला नवरदेवाच्या मनावरचा ताबा; स्टेजवरच ढासळला तोल आणि...; VIDEO VIRAL याआधीसुद्धा नवरदेवाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. नवरीने एंट्री करताच नवऱ्याला चक्कर आल्याचा हा व्हिडीओ. नवरीला पाहताच नवरदेव बेशुद्ध झाल्याचं नाटक करतो.View this post on Instagram
नवरीची वाट पाहणारा नवरदेव समोरच उभा असतो आणि नवरी समोर येताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. यादरम्यान हा नवरदेव आपल्या नवरीला पाहून बेशुद्ध होण्याचं नाटक करतो. मागे उभा असलेला त्याचा मित्र लगेचच त्याला पकडतो आणि त्याला समजवतो की थोडी वाट बघ. हे वाचा - लग्नानंतर नवरा-नवरी झाले आऊट ऑफ कंट्रोल; भररस्त्यातच घातला धिंगाणा; VIDEO VIRAL सोशल मीडियावर (Social Media) या व्हिडिओला सध्या चांगलीच पसंती मिळत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ लवलीन थापरनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ 80 हजारहून अधिकांना हा व्हिडिओ लाईक केला आहे. इतकंच नाही तर लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या क्यूट व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत नवरदेवाच्या रिअॅक्शनचं कौतुक केलं आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding couple, Wedding video