Home /News /viral /

VIDEO: भडकलेल्या नवरीचा रुद्रावतार; लेहंग्याच्या दुकानात जात फाडले लाखो रुपयांचे कपडे

VIDEO: भडकलेल्या नवरीचा रुद्रावतार; लेहंग्याच्या दुकानात जात फाडले लाखो रुपयांचे कपडे

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

महिलेचं नाव जियांग असं असल्याचं समोर आलं आहे आणि ती दक्षिण-पश्चिम शहर चोंगकिंगमधील एका ब्रायडल सलूनमध्ये जाऊन कात्रीने कपडे फाडताना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे

    नवी दिल्ली 18 जानेवारी : लग्नाच्या वेळीच अचानक समजलं की नवरीसाठी तयार केला जाणारा ड्रेस कॅन्सल केला गेला आहे आणि दुकानदार अॅडवान्स माघारी द्यायलाही तयार नाही, तर एखाद्या नवरीची काय अवस्था होईल? नवरीच्या रागाचा आपण अंदाज लावूही शकतो. मात्र यानंतर भडकलेली नवरी (Angry Bride) काय करेल, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. असंच एक प्रकरण चीनच्या चोंगकिंग शहरात पाहायला मिळालं. नवरदेवाला मागच्या सीटवर बसवून स्कूटीवर मंडपात पोहोचली नवरी; अनोखा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका भडकलेल्या नवरीने सलूनमध्ये जात एक-एक करून अनेक लग्नाचे कपडे फाडले (Bride Cut Up Many Wedding Dress at Bridal Salon). ही घटना तेव्हा घडली, जेव्हा स्टोअरने एक ऑर्डर अचानक कॅन्सल केली आणि यासाठी देण्यात आलेला अॅडवान्स परत देण्यासही नकार दिला. महिलेचं नाव जियांग असं असल्याचं समोर आलं आहे आणि ती दक्षिण-पश्चिम शहर चोंगकिंगमधील एका ब्रायडल सलूनमध्ये जाऊन कात्रीने कपडे फाडताना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. घटना ९ जानेवारीची आहे. डेली मेलने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं, की जियांगने 11,000 डॉलर म्हणजेच 8,12,063 रुपयांचे 32 लग्नाचे ड्रेस फाडले. महिलेनं 1250 डॉलर म्हणजेच 92,813 रुपयांचा एक ड्रेस ऑर्डर केला होता. ही ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर तिनं केलेलं 40,837 रुपयांचं अॅडवान्स पेमेंट परत करण्यास दुकानाने नकार दिल्याने महिलेनं हे कृत्य केलं. लग्नाला 2 वर्ष होऊनही प्रियकरावरील प्रेम नाही झालं कमी; तरुणीने उचललं मोठं पाऊल चीनी सोशल मीडिया नेटवर्क वीबो आणि ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये महिला स्टोरमध्ये जाऊन गोंधळ घालताना दिसते. न थांबता ती अनेक कपडे कापत राहाते. व्हिडिओमध्ये कोणाचातरी आवाजही ऐकू येतो, की नीट विचार कर, या ड्रेसेसची किंमत खूप जास्त आहे. यावर होणारी नवरी उत्तर देते, 'हजारो? भलेही ती कितीतरी दहा-हजार असो'. असं म्हणून पुढे ते हे कपडे फाडतच राहाते
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bride, Wedding video

    पुढील बातम्या