Home /News /viral /

VIDEO - मंडपातच ढसाढसा रडू लागली नवरीबाई; नवरदेवाने सर्वांसमोर जे केलं ते पाहून तोंडावर ठेवाल हात

VIDEO - मंडपातच ढसाढसा रडू लागली नवरीबाई; नवरदेवाने सर्वांसमोर जे केलं ते पाहून तोंडावर ठेवाल हात

नवरीबाईला रडताना पाहून नवरदेवाने भरमंडपात सर्वांसमोर असं काही केलं की पाहून हैराण व्हाल.

  मुंबई, 22 जानेवारी : लग्न हा बहुतेक मुलींसाठी खूप भावनिक असा क्षण असतो (Wedding video viral). सासरी जाण्याचा जितका आनंद तिला असतो तितकंच माहेर सोडण्याचं दुःखही असतं. हल्ली लग्नात मुली रडत नाही (Bride crying video), हसत हसत माहेरच्यांचा निरोप घेतात आणि सासरी जातात असं बहुतेक वेळा दिसून येतं. पण लग्नात एक तरी क्षण असा असतो जिथं त्यांच्या डोळ्यात पाणी येतंच. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Bride groom video). ज्यात नवरीबाईला भरमंडपातच रडू कोसळलं. लग्न लागणार होतंच, इतक्यात नवरीबाई ढसाढसा रडू लागली. तिने नवरदेवाला पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लग्नाआधीच नवरीला असं रडताना पाहून नवरदेवही आऊट ऑफ कंट्रोल झाला. रडणाऱ्या नवरीला पाहून त्याने सर्वांसमोर असं काही केलं ही सर्वजण शॉक झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्ही तर तुमच्या तोंडावरच हात ठेवाल. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांसमोर उभे आहेत. जशी नवरीबाई नवरदेवासमोर येते त्याला पाहते तेव्हा ती स्वतःला रोखू शकत नाही. तिच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटतो आणि मोठमोठ्याने ती रडू लागते. हे वाचा - हेच बाकी होतं! संशयी बायकोने नवऱ्याच्या पँटलाच ठोकलं दरवाजाचं टाळं; VIDEO VIRAL तिला रडताना पाहून नवरदेवही इतका इमोशनल होते की त्याच्याही डोळ्यातून पाणी येतं. तोसुद्धा रडू लागतो. पण त्याचवेळी तो रडणाऱ्या नवरीला शांत करण्याचाही प्रयत्न करतो. तिला प्रेमाने जवळ घेतो आणि सर्वांमसमोरच तिच्या गालावर किस करतो. त्यानंतर कसंबसं आपलं रडू आवरत तो तिच्यासोबत डान्स करत तिलाही हसवण्याचा प्रयत्न करतो.
  एकंदरीत व्हिडीओवरून दिसून येतं की या कपलचं लव्ह मॅरेज आहे. ज्याच्यावर आपण प्रेम केलं तोच आपला आयुष्याचा जोडीदार होणार आहे, हे पाहून या दोघांनाही इतका आनंद झाला आहे की तो त्यांच्या डोळ्यातून झळकत आहे. हे वाचा - नवरीचा डान्स पाहून भडकला नवरदेव; मंडपातच लगावली कानशिलात अन्... weddding_bells नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या