Home /News /viral /

बेस्ट फ्रेंडलाच लग्नात No entry; नवरीबाईने ठेवली विचित्र अट कारण...

बेस्ट फ्रेंडलाच लग्नात No entry; नवरीबाईने ठेवली विचित्र अट कारण...

नवरीबाईने आपल्या बेस्ट फ्रेंडलाच लग्नाच्या यादीतून बाहेर काढलं.

    लंडन, 26 जानेवारी : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा, अनमोल असा क्षण असतो. त्यामुळे आपल्या लग्नात आपलं कुटुंब, नातेवाईकांसह आपली बेस्ट फ्रेंडही असावीच असं बहुतेकांना वाटतं. पण एका महिलेने मात्र हद्दच केली. तिने आपल्या लग्नात सर्व मित्रमैत्रिणींना बोलावलं पण तिने आपल्या बेस्ट फ्रेंडलाच बॅन केलं (Bride best friend no entery in wedding). या महिलेने आपल्या स्वतःचा रेडिटवर आपल्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. काही आठवड्यांपूर्वीच तिने आपल्या लग्नाची तयारी करण्यासाठी आपल्या काही मित्रमैत्रिणींना बोलावलं. तिची प्री वेडिंग पार्टीही झाली. या सर्वात तिची बेस्ट फ्रेंडही होती. पण प्री-वेडिंग पार्टीत तिच्या बेस्ट फ्रेंडबाबत असं काही समजलं ज्यामुळे ती संतप्त झाली होती आणि तिने तिला आपल्या लग्नाच्या पार्टीच्या लिस्टमधून बाहेर केलं. तिची बेस्ट फ्रेंड प्रेग्नंट होती. तिला याबाबत माहितीच नव्हतं. कारण ती असे कपडे घालायची ज्यामुळे तिचं बेबी बम्प दिसायचं नाही. आता बेस्ट फ्रेंड प्रेग्नंट होणार म्हणजे खरंतर तिला आनंद वाटायला हवा होता. कारण तिचं लग्न आणि आता तिची मैत्रिणीही प्रेग्नंट हा तर खरं दुहेरी आनंद होता. पण तिला याचा राग आला. हे वाचा - प्रेग्नंट होताच समोर आलं पार्टनरचं 20 वर्षांपूर्वीचं गुपित; महिला हादरली याचं कारण म्हणजे तिच्या प्री-वेडिंग पार्टीत तिच्याऐवजी तिच्या मैत्रिणीचीच जास्त चर्चा होती, तिच्याकडेच सर्वजण लक्ष देत होते.  तिच्या प्री वेडिंग पार्टीत सर्वजण तिलाच प्रेग्न्सीच्या शुभेच्छा देत होते  (everyone congratulated the bride’s best friend on her pregnancy) . जेव्हा तिने आपल्या मित्रमैत्रिणींना बेस्ट फ्रेंडला शुभेच्छा देताना पाहिलं तेव्हा आपलं नटणंथटणं वायाच जाणार. सर्व पाहुणे तिला लग्नाच्या शुभेच्छा देण्याऐवजी मैत्रिणीलाच आई होण्याच्या शुभेच्छा देणार. तिच्याऐवजी तिची बेस्ट फ्रेंडचं सर्वांचं आकर्षण ठरेल. असं तिला वाटू लागलं. त्यामुळे प्री-वेडिंग पार्टीतच तिने आपल्या मित्रमैत्रिणींना सुनावलं. तुम्ही लोक माझ्या लग्नासाठी आला आहात ना तिच्या प्रेग्न्सीच्या पार्टीसाठी. हे वाचा - VIDEO-वयाच्या 7व्या वर्षी 4000 पुशअप्स मारून विक्रम; 16व्या वर्षी ओळखणं मुश्कील आता ही परिस्थिती आहे मग लग्नात काय होणार. कारण नवरदेवाचे नातेवाईकही त्या बेस्ट फ्रेंडला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होते, त्यामुळे नवरीबाईने मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या ब्रेस्ट फ्रेंडलाच लग्नात येण्यास बंदी घातली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Wedding

    पुढील बातम्या