Home /News /viral /

'ही तर योगा टीचर...' लग्नात नवरा हार घालत असताना नवरीने असं काही केलं की...Video Viral

'ही तर योगा टीचर...' लग्नात नवरा हार घालत असताना नवरीने असं काही केलं की...Video Viral

पारुल गर्ग (Parul Garg) नावाच्या मेकअप आर्टिस्टने एका लग्नातील वधू-वराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केलाय. हा व्हिडीओ एवढा मजेशीर आहे की, तुम्ही हसू आवरू शकणार नाही.

नवी दिल्ली, 21 जानेवारी : सध्या लग्नसराई सुरू असून सोशल मीडियावर वधू-वरांसह (Bride Groom) लग्नाशी (Wedding) संबंधित अनेक फोटो, व्हिडीओ दिसू लागले आहेत. रोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल ( viral videos ) होत आहेत. कोणी वधू-वरांसोबत फोटो, व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर (Social Media) टाकत आहे, तर कोणी लग्नामध्येच रिल्स तयार करत आहे. लग्नातील हे व्हिडीओ पाहून अनेकजण त्यांच्या लग्नात घडलेले मजेशीर प्रसंगही (Funny Incidents) शेअर करतात. नुकताच एका लग्नातील वधू-वराचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात वधूने केलेली कृती पाहून तुम्हालाही हसू येईल. वधू-वरांचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नुकताच पारुल गर्ग (Parul Garg) नावाच्या मेकअप आर्टिस्टने एका लग्नातील वधू-वराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केलाय. हा व्हिडीओ एवढा मजेशीर आहे की, तुम्ही हसू आवरू शकणार नाही. 'बेंड इट लाईक..' असं या व्हिडीओचं कॅप्शन आहे. 3 दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला तेव्हापासून व्हिडीओला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यावर इन्स्टाग्राम यूजर्स कडून अनेक कमेंट आल्या आहेत. एका यूजरने कमेंट दिली की, 'दीदी नक्कीच योग शिक्षिका आहेत.' तर, दुसर्‍याने 'मी आयुष्यात प्रथमच मॅट्रिक्स असलेली वधू पाहिली आहे.', अशी कमेंट केली आहे.

हे वाचा - खाली फिरतोय महाकाय मासा आणि वर पर्यटकाचं बोटींग; VIDEO पाहून भीतीच वाटेल!

नेमकं काय घडलं? हा व्हिडीओ एका लग्नाचा आहे, जिथे वधू आणि वर एकमेकांना हार घालण्यासाठी स्टेजवर उभे असल्याचं दिसत आहे. पण व्हिडीओचा सर्वात मनोरंजक भाग तेव्हा येतो, जेव्हा वर वधूला हार घालण्याचा प्रयत्न करतो. यावेळी नवरदेवाची थोडी मस्करी करण्यासाठी नवरीने असं काही केलं की, जे पाहून कोणालाही हसू आवरता येणार नाही. वराने वधूच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न करताच, नवरी मागे वाकते, त्यामुळे नवरदेवाला नवरीला हार घालणं अवघड होऊन जातं. हे पाहून सर्वजण हसू लागतात. वधू-वरही एकमेकांकडे बघून हसायला लागतात.

हे वाचा - महिलेने तर कमालच केली! चक्क नूडल्सपासून बनवला स्कार्फ; कसं ते तुम्हीच पाहा VIDEO

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणत्यातरी लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत असतो. यातील मजेदार प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडिया यूजर्सदेखील असे व्हिडीओ आवडीने पाहतात, शेअर करतात. बेंड इट लाईक.... या कॅप्शनसह व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
First published:

Tags: Bride, Bridegroom, Video viral

पुढील बातम्या