मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नमंडपातच नवरीनं विचारलं 'तू लग्न का करतोय'? नवरदेवाचं उत्तर ऐकून पिकला हशा, VIDEO

लग्नमंडपातच नवरीनं विचारलं 'तू लग्न का करतोय'? नवरदेवाचं उत्तर ऐकून पिकला हशा, VIDEO

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Funny Wedding Video) पाहायला मिळतं की नवरीनं आपल्या नवरदेवाला असा सवाल विचारला जो ऐकताच सगळेच विचारात पडले की आता नवरदेव काय उत्तर देईल.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 नोव्हेंबर : सध्या लग्नाचा सीझन (Wedding Season 2021) सुरू झाला आहे. अशात सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आजकाल नवरी आणि नवरदेव दोघंही आपल्या लग्नात भरपूर मस्ती करताना दिसतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video of Bride and Groom) नवरीबाईने कॅमेऱ्याच्या समोरच नवरदेवाला असा प्रश्न विचारला जो ऐकून नवरदेव गोंधळला. मात्र नवरदेवानेही नवरीच्या प्रश्नाचं अतिशय सुंदर उत्तर दिलं.

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Funny Wedding Video) पाहायला मिळतं की नवरीनं आपल्या नवरदेवाला असा सवाल विचारला जो ऐकताच सगळेच विचारात पडले की आता नवरदेव काय उत्तर देईल. मात्र नवरदेवानेही अतिशय खास पद्धतीने उत्तर दिलं. नवरीनं सर्वांसमोरच नवरदेवाला विचारलं की तू लग्न का करत आहेस? यावर नवरदेवाने हसतच उत्तर दिलं, 'कारण मला शांती नाही पाहिजे'. हे ऐकून तिथे उपस्थित पाहुणे आणि सर्व नातेवाईक जोरजोरात हसू लागले.

इन्स्टाग्रामवर प्रशांत बायोनिक नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ (Instagram Reels Video) अपलोड केला गेला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत लग्नातील हा व्हिडिओ 13 लाख 62 हजार लोकांनी लाईक केला आहे. तर तब्बल 10 लाख वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, मला नेहमी प्रॉब्लम पाहिजे. खूपच खास कॅप्चर केलेला व्हिडिओ.

First published:

Tags: Funny video, Wedding video