वधूचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर wedding_visual नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पाठवणीच्या वेळी नवरी नातेवाईकांना विचारते - तुमच्यापैकी कोणीही का रडत नाही?'. 10 मार्च रोजी अपलोड झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 55 लाखांहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक यावर मजेदार प्रतिक्रियाही देत आहे. Girl Video: विसरभोळ्या मुलीने स्कूटीसोबत केला प्रताप; लोक मात्र म्हणाले,'वाह दीदी वाह'! एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, 'ही नवरी खूप क्यूट यार आहे.' दुसरा यूजर म्हणतो की, घरातील सदस्यांनाच तिला लवकर पाठवायचं आहे असं दिसतंय. याशिवाय, इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते मित्र आणि नातेवाईकांना कमेंट सेक्शनमध्ये टॅग करून हा व्हिडिओ पाहण्यास सांगत आहेत. एकूणच या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Wedding video