Home /News /viral /

VIDEO : लग्नानंतर रस्त्यावर गाडीच्या मागे पळत सुटले नवरी-नवरदेव; नेमकं काय आहे प्रकरण?

VIDEO : लग्नानंतर रस्त्यावर गाडीच्या मागे पळत सुटले नवरी-नवरदेव; नेमकं काय आहे प्रकरण?

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की नवरी आणि नवरदेव रस्त्यावर धावत असतात. त्यांच्यासोबत आणखी एक मुलगा रस्त्यावर धावत आहे. तर काही महिला या तिघांच्या मागे धावत आहेत.

  नवी दिल्ली 02 मे : सोशल मीडियावर नवरी-नवरदेव आणि लग्नसमारंभातील निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिड़िओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे असतात. विशेषतः व्हिडिओ नवरीच्या पाठवणीचा असेल तर अनेकांचे डोळे पाणावतात. मजेशीर व्हिडिओबद्दल बोलायचं झालं, तर सोशल मीडियावर विनोदी व्हि़डिओंना नेटकऱ्य़ांची विशेष पसंती मिळते. हे व्हिडिओ नेटकऱ्यांनी खळखळून हसवतात. लग्नाच्या काही दिवस आधीच गर्लफ्रेंडनं केला ब्रेकअप; भडकलेल्या तरुणाने अतिशय विचित्र पद्धतीने घेतला बदला लग्नात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा असतात, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. अशाच एका लग्नातील अतिशय मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Bride and Groom) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही आणि व्हिडिओवर आलेल्या कमेंट पाहून तर तुम्ही पोट धरून हसाल.
  व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की नवरी आणि नवरदेव रस्त्यावर धावत असतात. त्यांच्यासोबत आणखी एक मुलगा रस्त्यावर धावत आहे. तर काही महिला या तिघांच्या मागे धावत आहेत. यातील सगळ्यात खास बाब म्हणजे नवरी आणि नवरदेवाच्या पुढे एक गाडीही चाललेली आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतं की नवरदेव-नवरी या गाडीमध्ये चढण्याच्या प्रयत्नात आहेत. आता नवरी-नवरदेवाचं अशाप्रकारे रस्त्यावर धावणं एखादी परंपरा आहे का (Strange marriage tradition), हे माहिती नाही. मात्र, व्हिडिओ पाहून असंच जाणवतं की ही काहीतरी वेगळी परंपरा आहे आणि लग्नाबाबतचा हा नियम दोघंही फॉलो करत आहेत. रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला केलं लग्नासाठी प्रपोज, पण नको ते घडलं, VIDEO कदाचितच तुम्ही याआधी अशा प्रकारचा व्हिडिओ पाहिला असेल, ज्यात नवरी आणि नवरदेव अशाप्रकारे रस्त्यावर धावत असतील. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ rkkhan6549 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 7.9 मिलियन म्हणजेच 79 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 2 लाख 81 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने मस्करी करत लिहिलं, बहुतेक गब्बर मागे लागला होता. तर, दुसऱ्या एकाने लिहिलं, ते बघत आहेत की लग्नानंतर नवरदेव पळून जाऊ शकतो का.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bridegroom, Wedding video

  पुढील बातम्या