मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अचानक मंडपातून उठून पळू लागले नवरदेव-नवरी; विचित्र Wedding Video पाहून भडकले नेटकरी

अचानक मंडपातून उठून पळू लागले नवरदेव-नवरी; विचित्र Wedding Video पाहून भडकले नेटकरी

Viral Wedding Video: लग्नाच्या दिवशी मंडपात नवरी-नवरदेव जेव्हा फेरे घेतात तेव्हा या फेऱ्यांना अतिशय महत्तव दिलं जातं. अशात एखाद्या प्रथेची मस्करी केली गेल्यास लोक भडकतात

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 20 डिसेंबर : सध्या देशभरात लग्नाचा सीझन (Wedding Season 2021) सुरू आहे. त्यामुळे दररोज हजारो लग्न होतात आणि यात अनेक लोक सहभागी होतात. नवरी आणि नवरदेव बऱ्याच दिवसांपासून लग्नाच्या तयारीला लागलेले असतात. सध्या सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Wedding Video) झाल्याचं दिसतं. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही संतापजनकही असतात.

कटू सत्य! शिक्षिका असताना होती गरीब, प्रोफेशन बदलल्यावर झाली गडगंज

लग्नाच्या दिवशी मंडपात नवरी-नवरदेव जेव्हा फेरे घेतात तेव्हा या फेऱ्यांना अतिशय महत्तव दिलं जातं. अशात एखाद्या प्रथेची मस्करी केली गेल्यास लोक भडकतात. असंच काहीसं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं (Netizens Trolled Bride and Groom).

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की ब्राह्मण नवरी आणि नवरदेवाला फेऱ्यांसाठी उभा राहायला सांगतात. मात्र, हे जोडपं फेऱ्यांसाठी उभा राहताच मंडपातच पळू लागतं. हे दृश्य पाहायला अतिशय वेगळं वाटतं. कारण सहसा फेऱ्यांच्या वेळी जोडपी मंडपात पळू लागल्याचं चित्र कधी दिसत नाही. व्हिडिओ पाहताना असं जाणवतं की कदाचित कॅमेरामनच्या सांगण्यावरुन नवरी आणि नवरदेव अशा पद्धतीने पळत आहेत. मात्र इंटरनेटवर नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही परंपरा अतिशय पवित्र मानली जाते. त्यामुळे ही अतिशय नम्रपणे आणि सौम्य पद्धतीनेच पार पाडायला हवी.

घरात एकटा असताना नवऱ्याचा 'नको तो उद्योग'; CCTV फुटेज पाहून बायकोही शॉक

व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेवाला अग्नीच्या चारही बाजूंनी पळताना पाहून इंटरनेट यूजर्सनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ Banthan Banno नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होताच लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. एका यूजरने लिहिलं, ही काय मस्करी आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिलं, आपल्या प्रथा-परंपरांसोबत मस्करी, हद्दच झाली. आणखी एकाने लिहिलं, यालाच म्हणतात पळून लग्न करणं.

First published:

Tags: Bridegroom, Wedding, Wedding video