मुंबई 05 मार्च : प्रत्येक व्यक्तीसाठी लग्नाचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच लोक याला खास बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. प्रत्येकाला आपल्या लग्नाची आठवण ठेवायची असते आणि लोक आपला खास दिवस पूर्ण आनंदाने अनुभवण्याचा प्रयत्न करतात. आजकाल डान्स करताना वधूची एन्ट्री, स्टेजवर गुडघ्यावर बसून वधूला फुलं देणं हे सगळं ट्रेंडमध्ये आहे. जेव्हा याच्याशी संबंधित व्हिडिओ इंटरनेटवर येतात तेव्हा ते लगेचच व्हायरल होतात. पण आजकाल असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात वधूला पाहून वर भावुक झाला आहे.
Video : कपलचा रोमान्स अचानक बदलला भांडणात, Kiss च्या बदल्यात एकमेकांना कानशिलात आणि..
भारतीय लग्नादरम्यान तुम्ही अनेकदा पाठवणीच्या वेळी वधूला रडताना आणि वराला स्टेजवर अगदी आनंदात बसलेलं पाहिलं असेल. वराच्या कुटुंबातील सदस्य वधूला त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी नाचतात,गातात आणि नंतर निघून जातात. मात्र असं क्वचितच घडतं की वधूला पाहून नवरदेव रडायला लागतो. पण असं म्हणतात की खरं प्रेम पूर्ण झालं की डोळ्यातून अश्रू येतातच. हेट दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे.
View this post on Instagram
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असंच दृश्य पाहायला मिळतं. ज्यात नवरदेव भावुक झाल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, खूप प्रयत्नांनंतर हे जोडपं एकत्र येऊ शकलं. त्यामुळे लग्नाच्या स्टेजवरच ते भावुक झाले. व्हिडिओमध्ये तुम्ही राहू शकता की वरमाळेच्या कार्यक्रमानंतर नवरी आणि नवरदेव स्टेजवर बसलेले आहेत. ते एकमेकांकडे पाहू लागतात आणि यानंतर रडू लागतात.
त्यांना पाहून लगेचच समजतं, की घरच्या लोकांनी मनवण्यासाठी त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागले आहेत. तेव्हा जाऊन त्यांचा विवाह होत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की आमच्या घरी लव्ह मॅरेजला परवानगी मिळाली नव्हती. यानंतरही आम्ही लग्नासाठी भांडत राहण्याचा आणि त्यांना मनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना सांगितलं की आम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलो आहोत. त्यांना समजवण्यासाठी आम्हाला 5 वर्ष लागले. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर simpleweddings नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Wedding video