Home /News /viral /

लग्नातील रोमान्स पडला भारी; पाहुण्यांसमोरच धाडकन कोसळले नवरदेव-नवरी, VIDEO

लग्नातील रोमान्स पडला भारी; पाहुण्यांसमोरच धाडकन कोसळले नवरदेव-नवरी, VIDEO

सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात दिसतं की लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) अतिशय उत्साही आहेत

  नवी दिल्ली 21 ऑक्टोबर : जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक खास क्षण येतात. मात्र, या सर्वात सर्वाधिक खास असतो तो लग्नाचा (Wedding Day) दिवस. याच कारणामुळे आपलं लग्न अधिक खास बनवण्यासाठी लोक भरपूर प्रयत्न करतात. प्रत्येक कपल हा क्षण अधिक खास बनवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा विचार करतं. मात्र, अनेकदा लग्नातच अशा काही मजेशीर घटना घडतात, ज्या पाहून सगळ्यांनाच हसू येतं. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ (Funny Wedding Video) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. कोणी बोनेटवर तर कोणी समोर; सिंहांनी चारचाकीला घेरलं अन्..; धडकी भरवणारा VIDEO सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात दिसतं की लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) अतिशय उत्साही आहेत. याच उतावळेपणामुळे नवरी आणि नवरदेव असं काही करतात, जे पाहून सगळ्यांनाच हसू येतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरी आणि नवरदेव अतिशय रोमँटिक मूडमध्ये डान्स फ्लोअरवर डान्स करत आहेत. इतक्यात ते धाडकन स्टेजवरच कोसळतात. हे पाहून तिथे उपस्थित सर्व लोक हसू लागतात. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं, की आपल्या लग्नासाठी हे कपल फार उत्साही आहे आणि याच नादात ते खाली कोसळतात.
  सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट होताच लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं, याला म्हणतात प्रेमात पडणं. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की नवरीचा आनंद पाहण्यासारखा आहे. आणखी एकानं लिहिलं की उतावळेपणामुळे अनेकदा अशा घटना घडतात. यामुळे थोडं सावध राहाणं गरजेचं आहे. बापरे! चालकाशिवायच वेगात धावू लागली दुचाकी; VIDEO पाहून नेटकरी शॉक हा व्हिडिओ haitianbeauty25 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला गेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ 12 ऑक्टोबरला शेअर केला गेला आहे. मात्र, आता तो व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाहीये. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन शेअरही केला आहे. याआधीही अनेक वेडिंग व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bridegroom, Wedding video

  पुढील बातम्या