गोइयाना, 30 डिसेंबर: वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले अनेक कैदी एका तुरुंगात (Prison) असतात. तुरुंगातील या जगात अनेक बेकायदेशीर गोष्टी घडत असल्याच्या अनेक बातम्या बाहेरच्या जगापर्यंत पोहोचतात तेव्हा खळबळ माजते. तुरुंगात चालणाऱ्या अनेक धक्कादायक गोष्टींचे दर्शन चित्रपटांमधूनही घडत असते. सर्वसामान्य लोकांसाठी या गोष्टी धक्कादायक असतात. तुरुंगात काय काय घडू शकते याची कल्पनाही सर्वसामान्य लोक करू शकत नाहीत. अशीच एक घटना ब्राझीलमध्ये (Brazil) उघडकीस आली आहे. इथल्या एका तुरुंगात चक्क ख्रिसमसची पार्टी (Christmas Party) झाली असून, त्यात कैदी आणि डान्सर्स यांनी अश्लील डान्स केल्याचं उघड झालं आहे. या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सर्वत्र चांगलीच खळबळ माजली आहे.
ब्राझीलमधील (Brazil) पर्नामबुको राज्यातील (Pernambuco) गोइयाना शहरात एका तुरुंगात ख्रिसमसनिमित्त 24 डिसेंबर 21 रोजी कैद्यांसाठी एका पार्टीचं (Party At Jail) आयोजन करण्यात आलं होतं. इथं 105 कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यासाठी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी चक्क डीजे आणि डान्सर्स बोलावण्यात आले होते. यावेळी डान्सर्सनी कैद्यांसमोर नृत्य करताना अत्यंत अश्लील हालचाली करत नृत्य केल्याचं एका व्हिडीओमुळे उघड झालं आहे. तुरुंगातील या पार्टीचा आणि डान्सचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. डेली स्टारने याबाबत वृत्त दिले आहे.
Prison lags hire twerking dancer to perform at Christmas party held inside jailhttps://t.co/ukkEUvASy1 pic.twitter.com/pj4U3GsQUF
— Daily Star (@dailystar) December 29, 2021
या व्हिडीओमध्ये एक डान्सर मुलगी गाण्याच्या तालावर नाचताना दिसत असून अनेक लोक तिला घेरून व्हिडीओ बनवत आहेत. काळे शॉर्ट्स, क्रॉप-टॉप, स्नीकर्स घातलेले नर्तक प्रसिद्ध ब्राझिलियन हिप-हॉप बीट Favela funk वर नाचत असल्याचे दिसत असून, कैदीही त्या तालावर नाच करताना दिसत आहेत. सगळेजण मौजमजा करण्यात मग्न झालेले दिसत असून, आपण तुरुंगात आहोत, कैदी आहोत याचं भान कैद्यांना उरलेलं नसून ते अगदी निर्धास्तपणे डान्सची मजा घेताना दिसत आहेत.
हे वाचा-तरुणाची भलतीच डेअरिंग! भुकेल्या चित्त्याची शिकार हिसकावली; पुढे काय घडलं पाहा
तुरुंगातील धमाकेदार पार्टीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुरुंगात अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेनं तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाच्या गलथान कारभारावर टीका केली जात आहे. यामुळे या घटनेची सखोल चौकशी सुरू झाली असून, तुरुंगातील एका कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे, तर तीन कैद्यांना त्या तुरुंगातून दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आले आहे. मात्र अद्याप या पार्टीला परवानगी देणारे अधिकारी, यात सहभागी झालेले अधिकारी आणि कैद्यांची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. या घटनेनं तुरुंग प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत जनतेतून सवाल केले जात असून, यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Brazil