झूमवर पालिकेची मीटिंग सुरू असताना कॅमेरा राहिला ऑन, SEX करताना दिसलं कपल आणि...

झूमवर पालिकेची मीटिंग सुरू असताना कॅमेरा राहिला ऑन, SEX करताना दिसलं कपल आणि...

ऑनलाइन मीटिंग सुरू असतानाच अचानक एक सदस्य व्हिडीओ कॉलमधून बाहेर पडला, मात्र त्याने कॅमेरा बंद केला नाही. कॅमेरा बंद न करता हे कपल शाररीक संबंध करताना दिसले.

  • Share this:

ब्राझिलिया, 19 ऑगस्ट : कोरोनामुळे जगभरातील जवळजवळ सर्व ऑफिसं बंद आहेत. त्यामुळे सर्व कामं सध्या ऑनलाइन सुरू आहेत. जगभरातील सर्वच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत दिली आहे. त्यामुळे मीटिंग्ज सध्या झूमच्या माध्यमातून ऑनलाइन केली जात आहेत. अशा परिस्थितीत कॅमेऱ्यासमोर भयंकर प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार ब्राझीलमध्ये घडला. व्हिडीओ कॉल झाल्यानंतर कॅमेरा बंद न करता एक कपल शाररीक संबंध करताना आढळले.

हा प्रकार एका सरकारी मीटिंगदरम्यान घडला. ब्राझीलच्या रिओ डी जेनेरियाच्या सिटी काउन्सिलच्या ऑनलाइन मीटिंग दरम्यान हा विचित्र प्रकार घडला. बैठकीत यावर चर्चा केली जात होती की, कोरोनाच्या काळात पालिका यंत्रणेमार्फत विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा कशी दिली जावी, या बैठकीत शहरातील अनेक महत्त्वाचे लोक उपस्थित होते.

ऑनलाइन मीटिंग सुरू असतानाच अचानक एक सदस्य व्हिडीओ कॉलमधून बाहेर पडला, मात्र त्याने कॅमेरा बंद केला नाही. कॅमेरा बंद न करता हे कपल शाररीक संबंध करताना दिसले. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही बैठक पुढील चार तास न थांबता सुरू होती. बैठकीस उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी हे दृश्य पाहिले, त्यानंतर सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांची बैठक चालू ठेवली.

बैठकीस उपस्थित समाजवाद आणि लिबर्टी पार्टीचे नेते, लिओनेल ब्रिजोला म्हणाले की हे घडत असल्याचे लक्षात येताच आम्ही तत्काळ ऑडिओ आणि व्हिडिओ कंट्रोल टीमला फीड बंद करण्यास सांगितले. कॅमेर्‍यावर असे कृत्य करणाऱ्या या व्यक्तीवर काही कारवाई झाली की नाही हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.

Published by: Priyanka Gawde
First published: August 19, 2020, 12:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या