Home /News /viral /

आग लागताच धावू लागले पेट्रोल पंपाजवळील लोक; धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव, VIDEO

आग लागताच धावू लागले पेट्रोल पंपाजवळील लोक; धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव, VIDEO

या पेट्रोल पंपावर अनेक लोक आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी उभा आहेत. इतक्यात तिथे उभा असलेल्या एका गुड रिक्षाच्या पुढील भागात आग लागते. हे पाहताच चालक लगेचच रिक्षामधून उतरतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतो

    नवी दिल्ली 27 मे : एखादं संकट जेव्हा अचानक ओढावतं तेव्हा माणसाला काहीही सुचत नाही, असं म्हटलं जातं. अशावेळी आपण इतकं घाबरतो की नेमकं काय करावं हेच कळत नाही. अशात बहुतेक लोक या संकटातून वाचण्यासाठी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही लोक असेही असतात जे पळ काढण्याऐवजी या संकटाचा धैर्याने सामना करतात. अशीच घटना एका पेट्रोल पंपावर पाहायला मिळाली, जिथे अचानक आग लागली (Fire Breaks out at Petrol Pump). यानंतर आसपास असलेले लोक तिथून पळू लागले. मात्र, एका महिलेनं मोठं धाडस दाखवलं. सांडपाण्याच्या 20 फूट खोल नाल्यात कोसळला चिमुकला; बचावासाठी आईनेही घेतली उडी अन्.., VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Viral Video of Brave Lady) चीनमधील एका पेट्रोल पंपावरचा आहे. या पेट्रोल पंपावर अनेक लोक आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी उभा आहेत. इतक्यात तिथे उभा असलेल्या एका गुड रिक्षाच्या पुढील भागात आग लागते. हे पाहताच चालक लगेचच रिक्षामधून उतरतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतो. इतर लोकही आपला जीव वाचवण्यासाठी तिथून लवकरात लवकर पळ काढतात. मात्र तिथेच उपस्थित असलेली पेट्रोल पंपावरील एक महिला कर्मचारी धाडस दाखवते. ती तात्काळ फायर सिलेंडर आणि आपल्या धाडसाने ही आग विझवते. महिलेच्या या धाडसाला लोक सलाम करत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत त्याला बहादूर महिलेला सलाम असं कॅप्शन देण्यात आलं आहे. सोबतच हेदेखील सांगितलं गेलं आहे की महिलेनं सतर्कतेनं आणि धाडसाने या परिस्थितीचा सामना करत आग विझवली, इतर लोक तिथून पळ काढत होते. महिलेनं वेळीच आग नियंत्रणात आणली नसती, तर मोठं नुकसान होण्याची शक्यता होती. बापरे बाप! वृद्ध व्यक्तीला सिंहाने जबड्यात धरून फरफटत नेलं; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य या धाडसी महिलेमुळे पेट्रोल पंपावर मोठी दुर्घटना टळली. लोक या महिलेच्या बुद्धीमत्तेचं आणि धाडसाचं कौतुक करत आहेत. अनेकांनी कमेंट करून महिलेच्या या कामाची प्रशंसा केली आहे. हा व्हिडिओ कठीण परिस्थितीतही धाडसाने आणि सतर्कतेनं संकटाचा सामना करण्याची प्रेरणा देणारा आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Fire, Shocking video viral

    पुढील बातम्या