मुंबई, 27 एप्रिल : भित्रा ससा ही गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. साधं एक झाडाचं पान अंगावर पडल्यानंतर आपल्या पाठीवर आकाश कोसळल्याची बोंबाबोंब करत फिरणारा तो ससा. तसं प्रत्यक्षातही ससा भित्राच. पण सोशल मीडियावर एका सशाचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ससा भित्रा कसा? असंच तुम्ही म्हणाल. किंबहुना यापुढे तुम्ही सशाला भित्रा कधीच बोलणार नाही
(Rabbit video).
ससाही किती हिंमतवाला असतो हेच या व्हिडीओतून तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यापेक्षा आकाराने कितीतरी पटीने मोठ्या असलेल्या दोन-दोन पक्ष्यांवरही तो भारी पडला आहे. शिकार करण्यासाठी आलेल्या या पक्ष्यांना त्याने चांगलाच धडा शिकवला आहे. इवल्याशा सशाची हिंमत पाहून भल्यामोठ्या पक्ष्यांनीही धूम ठोकली.
हे वाचा - Monkey चा Video पाहून भडकले नेटिझन्स; असं यात आहे तरी काय पाहा
व्हिडीओत पाहू शकता एका मैदानात एक ससा आहे. त्याच्या शेजारी दोन भलेमोठे पक्षी दिसत आहेत. पक्ष्यांचा आकार सशापेक्षा कितीतरी मोठा आहे. हे दोन्ही पक्षी सशाला घाबरवण्याचा, त्याच्यावर हल्ला कऱण्याचा प्रयत्न करतात. पण ससा काही घाबरत नाही. तो मोठ्या हिमतीने या पक्ष्यांना सामोरा जातो.
सुरुवातीला पक्ष्यांकडे पाठ करून असलेला हा ससा त्यांच्यासमोर छाती ताणून उभा राहतो आणि स्वतःच त्या पक्ष्यांसमोर जातो. इवल्य़ाशा सशाचं हे रूप पाहून त्या पक्ष्यांचीही हवा टाइट होते. लहान आणि सोपी शिकार समजून ज्या सशावर ते हल्ला करायला गेले, त्याच सशापासून ते दूर पळतात. आपलं इथं काही चालणार नाही, हा ससा काही आपल्या तावडीत सापडणार नाही हे त्यांनाही कळून चुकतं. त्यामुळे ते गुपचूप माघार घेतात. तिथून धूम ठोकतात.
हे वाचा - अजबच! महिलेनं चक्क पाळीव मांजरीसोबत बांधली लग्नगाठ; सांगितलं विचित्र कारण
safari_vid नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.