मराठी बातम्या /बातम्या /Viral /दारूड्यांसाठी लॉटरी! 100 रुपयांपेक्षाही कमी किमतीत ब्रँडेड दारूच्या बाटल्या; कुठे मिळतायेत पटापट पाहा

दारूड्यांसाठी लॉटरी! 100 रुपयांपेक्षाही कमी किमतीत ब्रँडेड दारूच्या बाटल्या; कुठे मिळतायेत पटापट पाहा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

स्वस्तातील दारूची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 08 फेब्रुवारी : बातमीचा मथळा वाचूनच दारूप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. ब्रँडेड दारू न परवडणाऱ्या पण पिण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तर ही लॉटरीच आहे. फक्त 100 रुपये किंबहुना त्यापेक्षाही कमी किमतीत ब्रँडेड दारूच्या बाटल्या मिळत आहे. स्वस्तात मिळणाऱ्या दारूच्या मेन्यूकार्डचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

स्वस्त दारू मिळावी म्हणून लोक काय काय नाही करत. काही लोक तर जिथं स्वस्त दारू मिळते तिथं जाऊन दारू घेऊन येतात. अशाच स्वस्त दारूच्या मेन्यूकार्ड व्हायरल झाल्यानंतर तुफान व्हायरल झाला आहे. इतकी स्वस्त दारू पाहून सर्वजण आश्चर्यचकीत होतील. ही दारू कुठे आणि कुणाला मिळते आहे पाहुयात.

@AnantNoFilter ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे. माझा बंगळुरूवाल्या डोक्याला या किमती समजत नाही आहेत.  दारूच्या इतक्या कमी किमती पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. यात व्हिस्की आणि बिअरच्या कित्येक ब्रँड अगदी कमीत कमी किमतीत मिळत आहेत. बहुतेक ड्रिंक्सची किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी आहे.

हे वाचा - दारू पिऊन टल्ली झाला बॉयफ्रेंड; गर्लफ्रेंडने जे केलं ते पाहून तुम्हीही तोंडात घालाल बोटं

आता या किमती पाहून तुम्हाला ही स्वस्त दारू कुठे मिळते हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. पण स्वतःला थोडं आवर घाला. कारण कदाचित तुमची निराशा होऊ शकते. कारण ही दारू तुमच्यासाठी नाही. आर्मीच्या कॅंटिनमधील हे मेन्यू कार्ड आहे. याच ट्विटवर रिप्लाय देत अनंत पुढे म्हणाले की, हा नेव्हीच्या मेसचा मेन्यू आहे.

आर्मी जवानांना सरकार बऱ्याच सामानांवर सूट देतं. सेंट्रल एक्साइज ड्युटीत सूट दिली जाते. त्याच वस्तूंपैकी एक म्हणजे म्हणजे महागडी दारू.  मिलिट्री कँटिनमध्ये दारू आणि किराणाचं सामान कमीत कमी  10-15% स्वस्त मिळतं.  दारू, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सामान सैनिक, माजी सैनिक आणइ त्यांच्या कुटुंबाला किफायतीशीर किमतीत विकलं जातं. कॅंटिनमध्ये वर्षाला जवळपास 2 अब्ज डॉलरपेक्षा अधिक विक्री होते. देशातील ही सर्वात मोठी रिटेल चेन आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सरकारने परदेशी सामान न ठेवण्याचे आदेश दिले होते.

हे वाचा - किती मद्यपान करणारी व्यक्ती मानली जाते हेव्ही ड्रिंकर? वाचा ओव्हरडोसचे दुष्परिणाम

ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बऱ्याच युझर्सनी आर्मी कँटिनमध्ये असे स्वस्त सामान दिलं जातं, याला चांगलं पाऊल म्हटलं आहे. तर काहींनी दारूच्या मूळ किमतीशी याची तुलना करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. एका युझरने तर हे नेमकं कुठे आहे असंही विचारलं आहे.

तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

First published:

Tags: Alcohol, Lifestyle, Viral