मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - मोठ्याने पिपाणी वाजवणाऱ्यांची पोलिसांनी वाजवली 'पुंगी'; आता तोंडातूनही 'आवाज' निघणार नाही

VIDEO - मोठ्याने पिपाणी वाजवणाऱ्यांची पोलिसांनी वाजवली 'पुंगी'; आता तोंडातूनही 'आवाज' निघणार नाही

रस्त्याने मोठ्या आवाजात पिपाणी वाजवून इतरांना त्रास देणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

रस्त्याने मोठ्या आवाजात पिपाणी वाजवून इतरांना त्रास देणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

रस्त्याने मोठ्या आवाजात पिपाणी वाजवून इतरांना त्रास देणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India
  • Published by:  Priya Lad

भोपाळ, 07 ऑक्टोबर : तुम्ही कधी ना कधी जत्रेला गेला असाल. जत्रा म्हटली की पिपाणी आलीच. फक्त लहान मुलंच नव्हे तर मोठी माणसंही पिपाणी घेतात आणि रस्त्याने मोठमोठ्याने वाजवत जातात. काही जण तर रस्त्याने चालणाऱ्या लोकांच्या कानातही पिपाणी फुंकतात. अशीच नागरिकांच्या कानात पिपाणी वाजवणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अशी शिक्षा दिली आहे. ज्यामुळे पिपाणी वाजवणं दूर तरुण यापुढे तोंडानेही मोठा आवाज काढणार नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दोन तरुण रस्त्याने मोठमोठ्याने पिपाणी वाजवत होते. तरुणींना पाहून ते पिपाणीचा आवाज अधिकच वाढवत होते. तिथं बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी हे पाहिलं आणि त्या तरुणांना थांबवलं. तरुणांना ऑन द स्पॉट पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी जी शिक्षा दिली ते हे तरुण आयुष्यभर लक्षात ठेवतील.

हे वाचा - तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी चालत्या बाईकवर उभा राहिला; तरुणासोबत भयंकर घडलं...; पाहा VIDEO

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पोलिसांच्या हातात पिपाणी आहे आणि पोलीस त्या तरुणांच्या कानात मोठ्याने फुंकतात. ज्या पद्धतीने तरुण इतर नागरिकांना पिपाणी वाजवत त्रास देत असतात अगदी तसंच पोलीसही या तरुणांसोबत करतात. याशिवाय दोन्ही तरुणांनाही एकमेकांच्या कानात पिपाणी वाजवायला सांगतात.

तरुणांकडे तुम्ही पाहिलं तर ज्या आवाजाने हे तरुण आधी पिपाणी वाजवत होते, तोच आवाज त्यांच्या कानात गेल्यावर त्यांना किती त्रास झाला आहे. त्यांनी आपले कान लगेच बंद करून घेतले.

हे वाचा - सोशल मीडियावर 'I Miss U' म्हणताच पोलिसांनी तरुणाला डांबलं तुरुंगात; नेमकं काय आहे प्रकरण वाचा

पोलिसांनी तरुणांना जशास तसा धडा शिकवला आहे. तेव्हा या तरुणांना आपली चूक कळली आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणांना सोडून दिलं. तरुणांचा चेहरा पाहून तर आता ते यापुढे पिपाणी काय, साधा तोंडानेही मोठा आवाज करणार नाहीत, असंच दिसतं.

पोलिसांनी या तरुणांना शिकवलेला धडा, त्यांच्यापुरताच मर्यादित नाही. तर यातून आपणही काहीतरी शिकायला हवं. तुम्हीही अशी चूक करत असाल तर आता ती सुधारा. तुमच्या ओळखीतील व्यक्तीही असं वागत असेल तर त्याला ही बातमी नक्की शेअर करा.

First published:

Tags: Madhya pradesh, Police, Viral, Viral videos