पाटणा, 18 मे : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (cm Nitiesh kumar) यांनी राज्यातील लॉकडाउन (Extension of Lock down in Bihar) वाढवत असल्यासंदर्भात एक ट्वीट करून माहिती दिली होती. या ट्वीटवर एका 'आशिक'नं कमेंट केली आणि त्यावर त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडनेही कमेंट केल्यानं या दोघांच्या कमेंट्सचीच जोरदार चर्चा होत आहे. मूळ मुद्दा राहिला बाजूला आणि भलत्याच कारणामुळे मुख्यमंत्र्यांचं ट्वीट चर्चेत आलं. सोशल मीडियाची हीच तर गंमत आहे.
बिहारचे सीएम नितीशकुमार यांनी 13 मे रोजी ट्वीट करून माहिती दिली की, कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळं बिहारमध्ये लॉकडाऊन येत्या दहा दिवस म्हणजे 16 ते 25 मे 2021 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे ट्विट पाहिल्यानंतर पंकज कुमार गुप्ता नावाच्या एका मजनूनं कमेंट करून जर या काळात लग्न करण्यासही बंदी घातली असती तर बरे झाले असते, त्यामुळं माझ्या गर्लफ्रेंडचं होणारं लग्न थांबलं असतं, असं म्हटलेय.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ट्वीटवर कमेंट करणारे कोण?
नितीशकुमार यांनी ट्विट केल्यानंतर पंकजने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, 'सर, जर या दरम्यान लग्नासारख्या कार्यक्रमांनाही बंदी घातली असती तर माझ्या गर्लफ्रेंड 19 मे रोजी होणारे लग्नही थांबले असते. आम्ही आयुष्यभर तुमचे आभारी राहिलो असतो. या कमेंटनंतर नव्या कुमारी नावाच्या एका अकाऊंटवरून या कमेंटला भारी प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
आज सहयोगी मंत्रीगण एवं पदाधिकारियों के साथ बिहार में लागू लॉकडाउन की स्थिति की समीक्षा की गयी। लॉकडाउन का सकारात्मक प्रभाव दिख रहा है। अतः बिहार में अगले 10 दिनों अर्थात 16 से 25 मई, 2021 तक लॉकडाउन को विस्तारित करने का निर्णय लिया गया है।
— Nitish Kumar (@NitishKumar) May 13, 2021
मग गर्लफ्रेंडनं केली अशी कमेंट
सर अगर शादी-ब्याह पे भी रोक लगा देते तो मेरी girlfriend की शादी थी 19 मई को वह भी रुक जाती" आप का हम जीवन भर आभारी रहेंगे 🙏🙏
— Pankaj Kumar Gupta (@PankajK78249443) May 13, 2021
नव्या कुमारीनं या कमेंटला उत्तर देताना लिहिलं आहे की, 'जेव्हा तू मला सोडून पूजाशी बोलायला गेलास तेव्हा मीसुद्धा खूप रडले होते. आता मी आनंदानं लग्न करीत आहे तर तू आता असं प्लीज करू नको. पण पंकज, जरी मी कोणाशीही लग्न केलं तरी माझ्या हृदयात नेहमी तूच असशील.
Remedisivir चोरलं आणि त्याऐवजी कोरोना रुग्णांना...; नर्सिंग स्टाफचा भलताच प्रताप
तू माझ्या लग्नाला नक्की ये, शेवटी तुला पाहून मला विदा व्हायचं आहे, असे म्हटले आहे. मात्र, हे ट्वीट खरंच एखाद्या मुलीनं केलंय की, कोणी फेक खात्यावरून केलंय याबाबत माहिती नाही. बऱ्याचदा बनावट खात्यावरूनही एखाद्याची गमंत करण्यासाठी अशा कमेंट देण्यात येतात. मात्र, याबाबत खात्रीलायक काही माहीत नसले तरी या दोन कमेंटची मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ट्विटपेक्षाही अधिक चर्चा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Love story, Nitish kumar