Home /News /viral /

30 हजार फूट उंचीवर BF ने GF सोबत केलं असं काही की तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

30 हजार फूट उंचीवर BF ने GF सोबत केलं असं काही की तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

बॉयफ्रेंडने जे केलं ते पाहून तरुणीलाही धक्का बसला आणि इतर सर्वजणही हैराण झाले.

  मुंबई, 29 जून : रिलेशनशिपमध्ये किमान एक तरी क्षण अविस्मरणीय असा बनवावा असा प्रयत्न बहुतेक कपलचा होतो (Boyfriend girlfriend video). आपल्या पार्टनरला सरप्राइझ देण्यासाठी, स्पेशल फिल करवण्यासाठी काही लोक काय काय नाही करत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडसोबत 30 हजार फूट उंचीवर असं काही केलं की पाहून सर्वजण हैराण झाले आहेत (Boyfriend surprise girlfriend video). इतक्या उंचीवर बॉयफ्रेंडने जे केलं ते पाहून गर्लफ्रेंडलाही धक्का बसला. विमानातील प्रत्येक जण शॉक झाला. किंबहुना आता सोशल मीडियावरही हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. असं या व्हिडीओत नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्याची, पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विमानात बसलेल्या प्रवाशांपैकी निधी नावाच्या महिलेला नार्कोटिक्सची टीम बोलावते आणि निधी नावाच्या महिलेला नार्कोटिक्सची टीम बोलावते. तिच्याजवळील बॅगेची तपासणी करते. महिला खूप घाबरते. तिच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्टपणे दिसते. हे वाचा - VIDEO - भावाने बहिणीला दिलं असं Wedding Gift; पाहताच नवरीबाईसह पाहुण्यांनाही रडू कोसळलं तिच्या बॅगेची चेकिंग सुरू असताना अचानक ती आपल्या डाव्या बाजूला पाहते. जशी ती मान वळवते तसा तिला धक्काच बसतो. कारण तिच्यासमोर दुसरा तिसरा कुणी नाही तर  चक्क तिचा बॉयफ्रेंड असतो. ज्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला आहे.  मास्क लावलेला असतानाही ती आपल्या बॉयफ्रेंडला ओळखते. तिला खूप आनंद होतो. त्यानंतर सर्वजण हसू लागतात.
  View this post on Instagram

  A post shared by Manu Raj (@manu_raj)

  गर्लफ्रेंडने ओळखताच बॉयफ्रेंडही आपल्या गुडघ्यावर बसतो. तिला पुष्पगुच्छ आणि अंगठी देत प्रपोज करतो. तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरत नाही. हे वाचा - 'नवरा भाड्याने देणं आहे', बायकोने सोशल मीडियावर दिली जाहिरात; कारणही आहे शॉकिंग निधी आपला बॉयफ्रेंड मनूला भेटण्यासाठी बंगळुरूला जात होती. बंगळुरू एअरपोर्टला भेटण्याचं त्यांचं ठरलं होतं. पण त्याआधीच बॉयफ्रेंडने तिला सरप्राइझ देण्याची प्लॅनिंग केली. मुंबईतच तो विमानात चढला. सर्व क्रू मेंबर्सना आपल्या प्लॅनमध्ये सहभागी केलं. निधी बंगळुरूला पोहोचण्याआधी मनूने तिला विमानाता सरप्राइझ दिलं.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Couple, Relationship, Viral, Viral videos

  पुढील बातम्या