मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रात्री गुपचूप भेटत होते Girlfriend-Boyfriend; ग्रामस्थांनी मिळून Love story चा केला The End

रात्री गुपचूप भेटत होते Girlfriend-Boyfriend; ग्रामस्थांनी मिळून Love story चा केला The End

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

तरुण-तरुणी एकमेकांना लपूनछपून भेटत असल्याचं ग्रामस्थांना समजलं आणि त्यानंतर त्यांनी रंगेहाथ पकडलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India
  • Published by:  Priya Lad

धनंजय कुमार/पाटणा, 07 ऑक्टोबर : सर्वांपासून लपूनछपून बोलणं, भेटणं हे प्रेमात होतंच असतं. पण या प्रेमीयुगुलांचं सत्य सर्वांसमोर आलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांना रात्री गुपचूप भेटत होते. या लव्ह बर्ड्सच्या लव्ह स्टोरीचा ग्रामस्थांनी मिळून द एंड केला आहे. बिहारच्या गोपालगंजमधील हे प्रेम प्रकरण आहे.

अमनपुरा गावातील संदेश कुमार महतो आणि परसौनी गावातील संगीता कुमारी दोघंही एकमेकांवर प्रेम करत होतं. त्यांचं लपूनछपून भेटणंही सुरू होतं. संदेश संगीताला भेटण्याासठी तिच्या गावात यायचा. याबाबत हळूहळू गावात सर्वांना समजलं. एक दिवस जेव्हा संदेश संगीताला भेटायला आला तेव्हा ग्रामस्थांना त्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर सर्व गाव संगीताच्या घरी पोहोचलं. तिथं त्यांनी दोघांनाही समोर बसवून त्यांच्याकडून खरं काय ते काढून घेतलं.

हे वाचा - तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी चालत्या बाईकवर उभा राहिला; तरुणासोबत भयंकर घडलं...; पाहा VIDEO

दोघांनीही आपण एकमेकांवर प्रेम करत असल्याची कबुली दिली. आपलं प्रेम प्रकरण दोन वर्षांपासून सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ग्रामस्थांनी संदेशच्या कुटुंबालाही संगीताच्या घरी बोलावून घेतलं. ग्रामस्थांनी संदेशच्या कुटुंबाला त्याचं लग्न संगीताशी लावून द्यायला सांगितलं. पण संदेशच्या कुटुंबाने लग्नाला नकार दिला आणि ते संदेशला आपल्यासोबत घेऊन जाण्यावर ठाम राहिले. अखेर ग्रामस्थांनी संदेश आणि संगीताचंच मत विचारलं. दोघंही लग्नासाठी तयार झाले.

अखेर ग्रामस्थांनी जवळच्या गावातील भीमपुरवा शिव मंदिरात त्यांचं लग्न लावून दिलं. अगदी सर्व विधी, परंपरेनुसार थाटामाटात लग्न झालं.  संगीताचे वडील या जगात नाहीत. तिची आई लग्नाला होती.

हे वाचा - सोशल मीडियावर 'I Miss U' म्हणताच पोलिसांनी तरुणाला डांबलं तुरुंगात; नेमकं काय आहे प्रकरण वाचा

लग्नानंतर संदीप आपल्या सासरी परसौनीला गेला. जर घरच्यांनी घेतलं नाही तर आपण संगीताला घेऊन वेगळं राहणार असल्याचंही त्याने सांगितलं.

First published:

Tags: Bihar, Viral, Viral videos, Wedding, Wedding video