नवी दिल्ली, 26 मे : जगभरात रोज अनेक घटना घडत असतात. यातील काही घटना इंटरनेटवर व्हायरल झालेल्या पहायला मिळतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, भावुक, धक्कादायक घटना समोर येत असतात. आपण विचारही करत नाही अशा गोष्टी लोक करतात आणि इंटरनेटवर एका दिवसात व्हायरल होऊन जातात. अशातच एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे ज्याने बिकिनी घातली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे.
एका तरुणाचा मुलींचे अंडरगारमेंट घातले आहेत. तो रस्त्यावर फिरताना दिसून आला. त्याला पाहताच लोकांनी त्याला कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात केली. सध्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगा मुलींचे अंडरगारमेंट घालून फुटपाथवरून चालताना दिसत आहे. एवढेच नाही तर या मुलाने डोक्याला लांब केसांचा विगही लावला आहे. हातात प्लॅस्टिकची पिशवी घेऊन तो फूटपाथवरून चालला आहे. तरुणाचा हा अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेता विषय ठरत आहे.
As promised by #ArvindKejriwal, he has turned #Delhi into London pic.twitter.com/sXMOVBKVMf
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) May 24, 2023
@MithilaWaala नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 22 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओवर कमेंटचा पाऊस आला आहे. लोक अनेक वेगवेगळ्या कमेंट करत त्याने बिकीनी का घातली असेल याचे तर्क वितर्क लावत आहेत. अनेकांनी तिची तुलना दिल्लीतील मेट्रोतील बिकिनी गर्लसोबत केली आहे.
दरम्यान, व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, या तरुणाने दिल्लीला लंडनमध्ये बदललं आहे. असे थक्क करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media viral, Viral, Viral videos