Home /News /viral /

रेल्वे ट्रॅकवर करत होता बाईक स्टंट, अचानक आली ट्रेन आणि...; पाहा घटनेचा थरारक VIDEO

रेल्वे ट्रॅकवर करत होता बाईक स्टंट, अचानक आली ट्रेन आणि...; पाहा घटनेचा थरारक VIDEO

एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर बाईक स्टंट (Bike Stunt) करताना दिसत आहे. मात्र, अचानक ट्रेन आल्यानंतर जे झालं, ते पाहून लोकही हैराण झाले आहेत.

    नवी दिल्ली 11 जून : सोशल मीडिया (Social Media) हे सध्या एक असं माध्यम ठरत आहे, जे रातोरात एखाद्याला प्रसिद्धीझोतात आणत आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर आपले निरनिरोळे व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न अनेकजण करताना दिसतात. मात्र, प्रसिद्धी मिळवण्याच्या या प्रयत्नात अनेकदा हे लोक स्वतःच्याच जीवाशी खेळ करतात. असंच एक प्रकरण गुजरातमधून समोर आलं आहे. यात एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर बाईक स्टंट (Bike Stunt) करताना दिसत आहे. मात्र, अचानक ट्रेन आल्यानंतर जे झालं, ते पाहून लोकही हैराण झाले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, की आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. यासाठी अनेकदा ते विचित्र कृत्य करताना दिसतात. तर, अनेक तरुण खतरनाक स्टंट करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. गुजरातमध्येही एक व्यक्ती हाच प्रयत्न करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण जामनगर रेल्वे ट्रॅकवर फोटोग्राफी करण्यासाठी गेला होता. साढिया पुलाजवळ त्यानं रेल्वे ट्रॅकवर आपली गाडी उभा केली आणि व्हिडिओ बनवू लागला. इतक्यात अचानक ट्रेन आली. या घाईत युवक स्वतः ट्रॅकपासून दूर झाला मात्र त्याला स्वतःची गाडी तिथून हटवण्याचा वेळ मिळाला नाही. यानंतर याचा परिणाम असा झाला की ही गाडी ट्रेनखाली आली. कपडे काढून रोडवर मारत होता स्टाइल, समोरून आली बाईक आणि... सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral on Social Media) झाला. हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले असून अनेकांनी यातील युवकाला सुनावण्यास आणि त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक लोक हा व्हिडिओ पाहून मजा घेत आहेत तर अनेकजण या युवकावर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bike accident, Shocking viral video, Train accident

    पुढील बातम्या