मराठी बातम्या /बातम्या /Viral /ट्रॅम्पोलिन जंपिंग करताना त्याने हवेतच केलं असं काही....'तो' थरारक Video व्हायरल

ट्रॅम्पोलिन जंपिंग करताना त्याने हवेतच केलं असं काही....'तो' थरारक Video व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

ट्रॅम्पोलिन जंपिंगचं क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. लोक ट्रॅम्पोलिन जंपिंग करतानाचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : ट्रॅम्पोलिन जंपिंगचं क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. लोक ट्रॅम्पोलिन जंपिंग करतानाचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या अनेक वर्षांमध्ये ट्रॅम्पोलिन जंपिंग बरंच लोकप्रिय झालं आहे. या खेळाचा थरार लोकांना आपोआपच स्वतःकडे आकर्षित करतो. अनेक लोक ट्रॅम्पोलिन जंपिंग करताना वेगवेगळे स्टंट करताना पहायला मिळतात. असाच एक स्टंट करताना एका मुलाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो हवेत वेगवेगळे कर्तब करत आहे. या मुलाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ धालत आहे.

ट्रॅम्पोलिन जंपिंग करणाऱ्या एका मुलाचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या टीमसोबत हवेत अप्रतिम स्टंट दाखवत आहे. पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या व्हिडीओध्ये मुलगा हवेत वेगवेगळे कर्तब करताना दिसत आहे. त्याची टीम त्याला सपोर्ट करताना दिसत आहे. मुलाचे स्टंट पाहून नेटकरीही थक्क झाले असून व्हायरल व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

@NextSkillslevel नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकवेळा पाहिला जात असून मुलाच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. स्वत:ला आव्हान देण्यासाठी काही ना काही हटके मार्गाचा वापर केला जातो, असं या व्हिडीओवरुन पहायला मिळत आहे.

दरम्यान, यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओंनाही नेटकऱ्यांनी चांगली पसंती दर्शवली होती. . बंजी जंपिंग, डर्ट बाइकिंग, स्कूबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग आणि हँग ग्लायडिंग असे साहसी खेळ खेळताना लोक पहायला मिळतात.

First published:

Tags: Social media viral, Top trending, Video viral, Viral, Viral news