अतिशहाणपणा नडला, 'कोरोना चॅलेंज' केलं व्हायरल आता त्यालाच झाला व्हायरस

अतिशहाणपणा नडला, 'कोरोना चॅलेंज' केलं व्हायरल आता त्यालाच झाला व्हायरस

जगभरातील अनेक लोकांनी चेष्टा मस्करी म्हणून हे चॅलेंज स्वीकारले. मात्र आता हेच चॅलेंज त्यांच्या अंगलट आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : कोरोनाव्हायरस हा विनोदाचा भाग नाही हे लोकांना कळून चुकले आहे. मात्र असे असले तरी सोशल मीडियावर आणि टिकटॉकवर कोरोनाबाबत अनेत व्हिडीओ शेअर केले जातात. एवढेच नाही तर कोरोना चॅलेंजही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. जगभरातील अनेक लोकांनी चेष्टा मस्करी म्हणून हे चॅलेंज स्वीकारले. मात्र आता हेच चॅलेंज त्यांच्या अंगलट आले आहे.

काही दिवसांपूर्वी तरुणाने कोरोना चॅलेंज म्हणून टॉयलेट सीट चाटल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता हाच तरूण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाची थट्टा करणाऱ्या या तरूणाला कोरोनानेच धडा शिकवला असे मत काही युझरने व्यक्त केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील लोक एकत्र येऊन उपाययोजना करत असताना ही अशी मंडळी सोशल मीडियावर चॅलेंज करून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकत आहेत.

वाचा-लॉक डाऊनमध्ये बीचवर गेलेल्या तरुणांना पोलिसांनी हेलिकॉप्टर आणून पकडलं

वाचा-कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू? काय आहे फोटोमागची कथा

वाचा-कोरोना माणसाला मारेल माणुसकीला नाही! शीखांनी 30 हजार लोकांसाठी तयार केलं लंगर

वाचा-PM Modi चं भाषण सुरू असताना तरुणानं पकडले कान, पुढे काय झालं पाहा VIDEO

जगभरात आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 21 हजार लोकांना मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी साऱ्या जगात लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र घरात बसून लोकं आता असे चॅलेंज सुरू करत आहेत. अनेक टिकटॉक स्टार या चॅलेंजमध्ये सहभागी होत आहेत. मात्र हे किती धोकादायक आहे, याचा प्रत्यय सर्वांना आला आहे.

First published: March 26, 2020, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading