रुग्णालयात गायलं 'अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना', तरुणाच्या मृत्यूनंतर गाण्याचा VIDEO VIRAL

रुग्णालयात गायलं 'अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना', तरुणाच्या मृत्यूनंतर गाण्याचा VIDEO VIRAL

गेल्या वर्षी या तरुणाच्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा कित्येक जण त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : सोशल मीडियावर  (Social Media) सध्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा तरुण रुग्णालयात एका बेडवर बसून हातात गिटार घेऊन गाणं गातो आहे. अच्छा चलता हूं, दुआओं मे याद रखना हे गाणं त्याने गायलं. हे गाणं त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

हा तरुण म्हणजे आसामचा ऋषभ दत्ता (Rishab Dutta). गेल्या वर्षी त्याच्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कित्येक जण त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले. 9 जुलैला बंगळुरूतील रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. ऋषभ आता आपल्यात राहिला नाही मात्र त्याचा आवाज राहिला. त्याने रुग्णालयाच्या बेडवर असूनही गायलेले सुरेल आवाजातील गाण्याचा हा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

ऋषभ हा आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपोथरमध्ये राहणारा होता. दोन वर्षांपूर्वी त्या अप्लास्टिक अॅनिमिया हा दुर्मिळ आजार असल्याचं निदान झालं. अनेक रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. मात्र तो बरा झाला नाही. अखेर तो आयुष्याचा लढा हरला. मात्र त्याचे व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होई लागलेत.

हे वाचा - 'दिल बेचारा'तील अभिनेत्रीसह रोमँटिक डान्स; सुशांत सिंह राजपूतचा Unseen Video

ऋषभने रुग्णालयात गिटात वाजवत रणबीर कपूरच्या ए दिल है मुश्किलमधील चन्ना मेरेया..., तसंच जवानी दिवानीती कबीरा गाणंही गायलं होतं. त्याचा आवाज ऐकण्यासाठी त्याच्या आजूबाजूला नर्स आणि आरोग्य कर्मचारीही असल्याचं दिसतं. त्याचे हे व्हिडीओ पाहून आता त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडलेला प्रत्येक जण भावुक झाला आहे. सर्वांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Published by: Priya Lad
First published: July 13, 2020, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading