मुंबई, 10 जून: आपण प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. सध्या कमीत कमी वेळेत लवकर फेमस होण्याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्ध होण्यासाठी तरुण-तरुणी आपले वेगवेगळे व्हिडीओ (Viral video) पोस्ट करतात आणि असे व्हिडीओ बनवण्यासाठी काय काय नाही करत. त्याचा परिणाम कधी कधी भलताच होतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी नेटिझन्स आपला व्हिडीओ कधीही आणि कुठेही बनवतात. त्यांना स्थळ, काळ, वेळेचंही ठिकाण नसतं. अशाच एका तरुणाने चक्क हायवेवर उभा राहून स्टंट मारत होता. त्यानंतर पुढे काय घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
हे वाचा - अरे बापरे! कोरोना लस घेतली आणि धाडकन जमिनीवरच कोसळला; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
हा व्हिडीओ प्रयागराजच्या ब्रीजवरील असल्याचं सांगितलं जातं आहे. ब्रीजवर एक तरुण आपला व्हिडीओ बनवत होता. आपला हटके अंदाज दाखवत होता. आपल्या शरीरावरील शर्ट उतारून तो हातात हवेत उडत धरतो. इतक्यात समोरून एक बाईक येते. या बाईकवर दोन तरुण बसलेले आहेत. ही बाईक स्पीडमध्ये येते आणि त्यावर बसलेले तरुण हातात शर्ट भिरकावणाऱ्या तरुणाच्या हातातील शर्ट खेचून सुसाट गेले.
हे वाचा - बॉलिवूड गाण्यांवर रोमान्स करणं पोलिसांना पडलं भारी; DCP ने दिली बजावली नोटीस
आपला शर्ट बाईकस्वार घेऊन गेले हे लक्षात येताच तरुणाने त्या बाईकचा पाठलाग केला पण तोपर्यंत बाईक पुढे निघून गेली होती. रिल्स बनवायला गेला पण झालं भलतंच. हा व्हिडीओ पाहून अनेक जण मजेशीर कमेंट देत आहेत. हा व्हिडीओ viralsarcasm ने शेअर केल्याचं वृत्त झी न्यूजने दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike riding, Funny video, Shocking viral video, Viral, Viral videos