मराठी बातम्या /बातम्या /Viral /

9 वी पास मुलानं भारतीय जुगाड करत बनवली भन्नाट बाईक

9 वी पास मुलानं भारतीय जुगाड करत बनवली भन्नाट बाईक

नववी पास (9th pass) असणाऱ्या सय्यद सैफ (sayyad saif)  जुगाड लावून आपल्या आवडीची बाईक (Unique bike) बनवली आहे. जुन्या आणि भंगारातल्या वस्तूतून काय बनवलं जावू शकतं याचा प्रत्यय त्यानं दिला आहे.

  • Published by:  News18 Desk
धमतरी, 26 डिसेंबर: खरं तर भारत (India) हा जुगाडूंचा देश म्हणून ओळखला जातो. जपान किंवा अमेरिका यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत प्रगती केलेल्या देशांत जेव्हा कंपनीत एखादी समस्या उद्भवते, तेव्हा तेथील कंपन्या एक समिती स्थापन करतात. मग त्यावर संशोधन केलं जातं आणि या सगळ्या प्रक्रियेत लाखो रुपये खर्च करून मग या समेस्येचं समाधान शोधलं जात. पण भारतात मात्र असं होतं नाही. समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर चांगल्याप्रकारे जुगाड शोधून काढण्याचं कौशल्ये भारतीयांमध्ये उपजतच असावं. ध्येयाला प्रयत्नांची जोड असेल तर आपल्याला यश मिळविण्यापासून रोखू शकत नाही. छत्तीसगडच्या धमतरी येथील नववी (9th) पास असणाऱ्या मुलानं जुगाड करून आपल्या आवडीची बाईक बनवली आहे. जुन्या आणि भंगारातल्या वस्तूमधून काय बनवलं जावू शकतं याचा प्रत्यय या मुलानं दिला आहे. त्यानं विविध वाहनांचे भाग एकत्र करून नवीन प्रकारची एक भन्नाट बाईक निर्माण केली गेली. विशेष म्हणजे तो काही मेकॅनिकल इंजिनिअरींगचा पदवीधारक नाही, तो केवळ नववी पास आहे. धमतरी जिल्ह्यातील मगरलोड ब्लॉकच्या सिंगपूर गावात राहणाऱ्या या जुगाडू मुलाचं नाव सय्यद सैफ असं आहे. त्याचे वडील सायकल मेकॅनिक होते. सैफला अभ्यासात फार काही रस नव्हता म्हणून त्यानं वडिलांसोबत मेकॅनिकचं काम शिकायला सुरुवात केली. आज त्याला बऱ्यापैकी वाहनांची कामं जमतात. आता सैफ मेकॅनिकच्या कामात मास्टर झाला आहे. त्याच्या मास्टरकीचा पुरावा म्हणजे त्याने बनवलेली भन्नाट बाईक. जेव्हा तो रस्त्यावरून ही बाईक चालवत असतो, तेव्हा लोकं वळून येऊन ही बाईक कशी बनवली ते विचारतात. अशी बनवली बाईक सय्यदने सांगितलं की त्याने बनवलेल्या दुचाकीमध्ये सुझुकीचं इंजिन, यामाहाची बॉडी, स्कूटरची चाकं आहेत. ही बाईक बनवण्यासाठी त्यांने किमान 5 प्रकारच्या वाहनांचे बॉडी पार्ट्स वापरले आहेत. यासाठी सैफनं कुठेही प्रशिक्षण घेतलं नाही ना कोणत्याही व्यक्तीची मदत घेतली. हे सर्व त्यानं स्वतःहून केलं आहे. त्याच्या मेहनतीतून त्यानं ही अनोखी बाईक बनवली आहे. बर्‍याच लोकांना ही बाईक आवडली असून ही बाईक खरेदी करण्याची त्यांची इच्छा आहे, असंही सैफने यावेळी सांगितलं.
First published:

पुढील बातम्या