Home /News /viral /

उंच इमारतीवरुन तरुणाने घेतली उडी, पुढे काय घडलं बघा; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

उंच इमारतीवरुन तरुणाने घेतली उडी, पुढे काय घडलं बघा; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

यात एक तरुण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बीमवर असा स्टंट करतो, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. कारण इथे छोटी चूक झाली तर या तरुणाचा जीवही जाऊ शकत होता.

  नवी दिल्ली 30 मे : सिनेमांमध्ये एकापेक्षा एक खतरनाक स्टंट करताना तुम्ही हिरोला पाहिलं असेल. मात्र हे स्टंट प्रोफेशनल्सच्या देखरेखीखाली केले जातात. त्यासाठी तासनतास मेहनत आणि सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपायांची काळजी घेतली जाते. पण काही लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपला जीवही धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. सध्या अशाच एका स्टंटचा व्हिडिओ व्हायरल (Stunt Video Viral) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही तोंडात बोटं घालाल. यात एक तरुण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बीमवर असा स्टंट करतो, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. कारण इथे छोटी चूक झाली तर या तरुणाचा जीवही जाऊ शकत होता. रस्त्यावर स्केटिंगचा आनंद लुटत होती तरुणी; काहीच वेळात नको ते घडलं, Shocking Video व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या गोलाकार खांबाच्या जवळ असलेल्या बीमवर उभा आहे. यानंतर हा तरुण जे काही करतो, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्ही पाहू शकता की या बीमची लांबी आणि रुंदी किती आहे. हा तरुण अचानक एका बीमवरुन दुसऱ्या बीमवर उडी घेतो. इतकंच नाही तर उडी मारल्यानंतर तो अगदी सहज आपले पाय आधी हवेतच खाली घेतो आणि यानंतर वरती घेतो. इथे त्याच्याकडून थोडीही चूक झाली असती तर तर इमारतीवरुन खाली कोसळू शकत होता. असं झाल्यास त्याची काय अवस्था झाली असती, याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
  अंगावर काटा आणणारा हा स्टंट व्हिडिओ nature_explore_hub नावाच्या पेजवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'हा स्टंट अजिबातही ट्राय करू नका'. हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. VIDEO: दोरी किंवा शिडीशिवाय 37 व्या मजल्यावरुन खाली उतरण्याचा तरुणाचा प्रयत्न, पाहा भयानक शेवट एका यूजरने कमेंट करत म्हटलं, 'आत्मविश्वास आहे हे ठीक आहे, पण असे जीवघेणे स्टंट करू नका.' दुसऱ्या एकाने लिहिलं, अशाप्रकारच्या पोस्ट शेअर करत जावू नका. तर आणखी एकाने लिहिलं की हा मुलगा वेडा आहे. एकंदरीतच मुलाचा हा स्टंट पाहून लोक त्याचं कौतुक करत नाहीयेत, तर हैराण होऊन त्याला असं न करण्याचा सल्ला देत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Stunt video

  पुढील बातम्या