नवी दिल्ली 24 जानेवारी : उत्साहाच्या भरात विचार न करता एखादं काम करू नये, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण यात बऱ्याचदा स्वतःचंच नुकसान होतं. विशेषतः स्टंट करताना तर सरावाची भरपूर गरज असते, तरच स्टंट यशस्वी होतो आणि काही दुखापतही होत नाही. मात्र, काही लोक या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचाच जीव धोक्यात टाकतात. लहानपणी तुम्हीही सायकल चालवली असेल आणि पाण्याच्या खड्ड्यांमधून ती जोरात पळवलीही असेल. मात्र असं करताना अनेकदा आपल्याला दुखापत होण्याचीही शक्यता असते. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Cycle Stunt Viral Video) झाला आहे. यात दिसतं, की सायकल स्टंट करताना एक मुलाला चांगलाच मार लागला.
...अन् नवरीबाई झाली आऊट ऑफ कंट्रोल; मंडपातच केलं हे काम, VIDEO पाहून व्हाल थक्क
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका ठिकाणी रस्त्यावर छोटा खड्डा आहे आणि त्यात पाणी साठलेलं आहे. मात्र, पाहताना असं जाणवत नाही की हा खड्डा मोठा असेल. परंतु प्रत्यक्षात तिथे मोठा खड्डा असतो. एक मुलगा अतिशय वेगात आपली सायकल चालवत हा खड्डा पार करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कदाचित त्याला हे माहितीच नसतं की हा खड्डा किती खोल आहे. सायकल खड्ड्यामध्ये घालताच त्याचा बॅलन्स बिघडतो. हा मुलगा सायकलसह खाली कोसळतो. ज्या पद्धतीने तो पडतो, ते पाहूनच समजतं की त्याला भरपूर मार लागलेला आहे.
View this post on Instagram
आधी हा मुलगा खाली कोसळतो आणि नंतर त्याच्या अंगावर सायकल पडते. यानंतर बराच वेळ तो तिथेच पडून राहातो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ zameer0603 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 4 मिलियन म्हणजेच 40 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 2 लाख 30 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
या व्हिडिओवर लोकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, अखेर बुडालाच. तर दुसऱ्या यूजरने मस्करी करत लिहिलं, ‘जोर का झटका जोरों से लगा है’. आणखी एका यूजरने कमेंट करत म्हटलं, स्लो मोशनमध्ये भयंकर मार लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.