Home /News /viral /

40 फूट खोल विहिरीतून येत होता विचित्र आवाज, जवळ गेल्यावर जे काही दिसलं पाहून गाव हादरलं

40 फूट खोल विहिरीतून येत होता विचित्र आवाज, जवळ गेल्यावर जे काही दिसलं पाहून गाव हादरलं

एका 40 फूट खोल कोरड्या विहिरीतून अचानक विचित्र आवाज येत होता. त्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं होतं.

    बिहार, 29 सप्टेंबर : बिहारमधील एका गावात दिवसाढवळ्या एक विचित्र प्रकार घङला. येथील मुंगेर गावात एका 40 फूट खोल कोरड्या विहिरीतून अचानक विचित्र आवाज येत होता. त्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं होतं. विहिरीत वाकून पाहण्याची हिम्मत कोणी करत नव्हता. मात्र गावकऱ्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून ते हैराण झाले. 40 फूट खोल विहिरीजवळ गेल्यानंतर लोकांना एक मुलगा विहिरीत पडल्याचे कळले आणि तो मदतीसाठी आवाज देत होता. येथील रहिवाली आपल्य़ा 13 वर्षीय मुलासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेले. त्याचवेळी अचानक मुलगा अभिषेक विहिरीवर चढून फुलं काढत असताना तोल जाऊन 40 फूट खोल विहिरीत पडला. अभिषेकचा आवाज ऐकून आसपासचे लोक विहिरजवळ जमा झाले. वाचा-भरधाव वेगानं आला ट्रक, रस्त्यावरील 4 गाड्यांना चिरडून घराच्या दिशेनं गेला आणि... विहिरीत पडलेला अभिषेक वडिलांना आवाज देत होता. लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि रेस्क्यू ऑपरेशन पथक घटनास्थळी दाखल झाली. जेव्हा बचाव मदत दल दोरीने विहिरीत उतरले तेव्हा तेथे ऑक्सिजनची कमतरता भासली. मात्र त्यांनी मुलाला दोरीने बांधलं. रेस्क्यू ऑपरेशन करणारे विहिरीत उतरले तेव्हा त्यांना विहिर कोरडी असल्याचे कळले. मात्र दोरीला बांधून अभिषेकला बाहेर काढण्यात आले. वाचा-पुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन अभिषेक गंभीर जखमी झाला होता. त्याला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे काहीच वैद्यकीय सुविधा नव्हती. कुटुंबीयांनी प्रशासनाकडे तक्रार केली त्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी मुलावर उपचार सुरू केले. अभिषेक तब्बल अडीच तास विहिरीत अडकला होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या