मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कारवर चढून स्टंट करत होता तरुण; पुढच्याच क्षणी झाली वाईट अवस्था, Watch Video

कारवर चढून स्टंट करत होता तरुण; पुढच्याच क्षणी झाली वाईट अवस्था, Watch Video

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की रस्त्याच्या कडेला काही कार पार्क करण्यात आल्या आहेत. एक तरुण कारच्या मागील बाजूवर उभा राहून काहीतरी स्टंट करण्याचा प्रयत्न करतो

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की रस्त्याच्या कडेला काही कार पार्क करण्यात आल्या आहेत. एक तरुण कारच्या मागील बाजूवर उभा राहून काहीतरी स्टंट करण्याचा प्रयत्न करतो

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की रस्त्याच्या कडेला काही कार पार्क करण्यात आल्या आहेत. एक तरुण कारच्या मागील बाजूवर उभा राहून काहीतरी स्टंट करण्याचा प्रयत्न करतो

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 11 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ खळखळून हसवणारे तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. मात्र, काही व्हिडिओ नकळत आपल्याला हा संदेश देऊन जातात, की कोणत्या चुका करू नये. कारण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात लोक असं काही करतात ज्यामुळे नंतर त्यांना पश्चाताप होतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं की एक तरुण कारवर आपली कला दाखवण्याच्या नादात (Stunt on Car) असं काही करून बसतो, की फार उशिरा त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. OMG! जंगलात 6 सिंहासोबत फिरताना दिसली तरुणी; VIDEO पाहून व्हाल शॉक ट्विटरवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अवघ्या 10 सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की रस्त्याच्या कडेला काही कार पार्क करण्यात आल्या आहेत. एक तरुण कारच्या मागील बाजूवर उभा राहून काहीतरी स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान काही मित्र त्याचा व्हिडिओ शूट करत आहेत. मात्र पुढच्याच क्षणी असं काही घडतं, ज्याची कल्पनाही या तरुणाने किंवा त्याची मित्रांनी केली नसेल. हँड स्टँड करतानाच हा तरुण धाडकन कारच्या मागील बाजूच्या काचेवर कोसळतो. यामुळे गाडीची काच फुटते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा तरुण काचेवर पडल्यानंतर त्याचे काही मित्र हसू लागतात. तर एक मित्र शॉकिंग रिअॅक्शन देतो. व्हिडिओ पाहून असं वाटतं की ही कार याच मित्राची असावी, आणि काच तुटल्याने त्याला वाईट वाटलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर द डार्विन अवार्ड्स नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 4 डिसेंबरला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 10 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. यासोबतच अनेक यूजर्सनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. 12 वर्षीय मुलीचं बॉक्सिंग स्किल पाहून व्हाल अवाक; हाताने पाडलं मोठं झाड, VIDEO एका यूजरने या तरुणाची चेष्टा करत लिहिलं, हा व्यायाम तर भलताच महागात पडला. तर दुसऱ्या एका युजरने सवाल विचारला, की या तरुणाने हा स्टंट आपल्याच कारवर केला होता, की दुसऱ्या व्यक्तीच्या. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एकंदरीतच हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
First published:

Tags: Funny video, Stunt video

पुढील बातम्या