Home /News /viral /

VIDEO - नादच करायचा नाय! हळदीत नाचता नाचता तरुणीच्या प्रेमात पडला; पठ्ठ्याच्या मोबाईल नंबर देण्याच्या स्टाईलवर सर्वजण फिदा

VIDEO - नादच करायचा नाय! हळदीत नाचता नाचता तरुणीच्या प्रेमात पडला; पठ्ठ्याच्या मोबाईल नंबर देण्याच्या स्टाईलवर सर्वजण फिदा

लग्नाच्या हळदीत कुणालाही न कळता तरुणीला आपला मोबाईल नंबर देण्यासाठी तरुणाने भन्नाट शक्कल लढवली.

    मुंबई, 02 मे : लग्न म्हटलं त्यात नवरा-नवरीशिवाय आणखी काही लोकांचं नातं किंवा प्रेम जुळत असतं (Wedding video). असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Haldi dance video). ज्यात लग्नाच्या हळदीत नाचता नाचता एक तरुण एका तरुणीच्या प्रेमात पडला. पण त्यानंतर त्या तरुणाने ज्या पद्धतीने तिच्यासोबत आपला मोबाईल नंबर शेअर केला तो एकदम हटके आहे. लग्नात काही लोक एकमेकांना ओळखत नसतात. म्हणजे नवरा-नवरीकडील सर्वच मंडळींनी एकमेकांना पाहिलेलं नसतं. अशात एखादं असं कुणीतरी दिसतं ज्यामुळे आपल्या हृदयाची धडधड वाढते. पाहताच क्षणी त्या व्यक्तीच्या प्रेमात आपण पडतो. काही वेळा समोरच्याकडूनही तसे संकेत मिळतात. पण दोघांचीही ही पहिलीच भेट असते. अशावेळी सर्वांसमोर असं अचानक एकमेकांशी बोलायचं कसं असा प्रश्न अनेकांना पडतो. सामान्यपणे अशा परिस्थितीत एखाद्या टिश्यू पेपरवर आपला नंबर लिहून दिल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं असेल. पण या व्हिडीओतील तरुणाने त्यासाठी जबरदस्त जुगाड केला आहे. त्याने अशी शक्कल लढवली, जी पाहून तुम्हीही त्याच्या स्टाइलवर फिदा व्हाल. हे वाचा - लग्नासाठी पाहिलेल्या मुलासोबत असं काही केलं की...; लेकीचा प्रताप पाहून वडीलही शॉक व्हिडीओत पाहू शकता एक तरुण हळदीच आपल्याच धुंदीत नाचतो आहे. इतक्यात त्याची नजर एका तरुणीवर पडते. नाचता नाचता तिला पाहताच तिच्या प्रेमात तो पडतो. ती तरुणी दुसऱ्या तरुणीसोबत गप्पा मारत असते. तिची नजरही त्याच्याकडे जाते आणि तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडते. त्यानंतर तो तरुण तिला हातांनी कॉल कर म्हणून खुणावतो. त्यानंतर तो आपले हात वर करून हाताची बोटं दाखवून तिला मोबाईल नंबर देतो. तरुण एकएक स्टेप करत आपल्या हातांची बोटं दाखवत तिला मोबाईल नंबर सांगतो. तरुण अशा पद्धतीने नंबर देतो की त्याच्या आजूबाजूला असलेल्या कुणालाच समजतही नाही. हे वाचा - कधीच पाहिली नसेल अशी विचित्र चोरी; Bike chori चा Shocking Video Viral तरुणी ते नंबर आपल्या मोबाईलवर टाइप करते. नंबर पूर्ण झाल्यानंतर ती कॉल करते आणि तरुणाच्या मोबाईलची रिंग वाजते.मोबाईलवर तिचा आलेला कॉल पाहून तरुणाच्या आनंदाला पारावर उरत नाही. मोबाईल हातात घेऊन तो जोशात नाचू लागतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Marriage, Viral, Viral videos, Wedding

    पुढील बातम्या