Home /News /viral /

अतिउत्साह पडला महागात! सायकलवर स्टंट करायला गेलेल्या मुलासोबत घडलं भलतंच; पाहा VIDEO

अतिउत्साह पडला महागात! सायकलवर स्टंट करायला गेलेल्या मुलासोबत घडलं भलतंच; पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये एक तरुण सायकलवर स्टंट (Cycle Stunt) करताना दिसतो. मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत जे काही घडलं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

  नवी दिल्ली 04 डिसेंबर : आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. अनेकदा तर लोक स्वतःचा जीवही धोक्यात टाकतात. स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Stunt Video Viral on Social Media) होत राहतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ अतिशय धक्कादायक असतात. काही व्हिडिओ असेही असतात जे पाहून सर्वांच्याच अंगावर काटा येतो. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण सायकलवर स्टंट (Cycle Stunt) करताना दिसतो. मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत जे काही घडलं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. असं म्हटलं जातं की जीवन खूप अनमोल आहे. हे सुंदर आयुष्य अतिशय खास पद्धतीने जगायला हवं. मात्र, काही लोक याचा अजिबातही विचार करत नाहीत आणि आपला जीव धोक्यात टाकतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या जीवासोबत खेळत असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ ‘__ig.mehul’ नावाच्या अकाऊंटवर पाहू शकता. बातमी देईपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की दोन व्यक्ती सायकलवरुन जात आहेत. यातील एक मुलगा सायकलवरुन पुढे निघून जातो. इतक्यात त्याचा दुसरा मित्र त्याची बरोबरी करण्यासाठी सायकल अधिक वेगात पळवतो आणि त्या मुलाच्या जवळ येतो. मात्र, इतक्यात मागे चालणारा मुलगा सायकलवर स्टंट करण्याचा प्रयत्न करतो आणि धाडकन आपटतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोक वारंवार हा व्हिडिओ पाहत आहेत.
  व्हिडिओवर अनेक यूजर्सनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, हे तर सरळसरळ मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं, असं काही करण्याआधी हे लोक आपल्या आई-वडिलांचा विचार का करत नाही. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Stunt video

  पुढील बातम्या