Home /News /viral /

रस्त्यावर वेगात चालवत होता सायकल; इतक्यात अचानक निघून पडलं चाक; घटनेचा Shocking Video

रस्त्यावर वेगात चालवत होता सायकल; इतक्यात अचानक निघून पडलं चाक; घटनेचा Shocking Video

एका मुलाच्या सायकलचं चाक अचानक निघून जातं, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतरही तो मुलगा सायकल थांबवत नाही आणि पुढे जात राहतो (Stunt on Cycle).

    नवी दिल्ली 23 एप्रिल : इंटरनेटच्या जगात सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला लोकांचं टॅलेंट दाखवणारे एकापेक्षा एक व्हिडिओ (Stunt Viral Video) पाहायला मिळतात. कधी कोणी प्राण्यांसोबत मस्ती करताना दिसतं तर कधी कोणी आपलं डान्सिंग स्किल (Dancing Skill) दाखवताना पाहायला मिळतं. काही लोक तर व्हिडिओ आणि फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलाच्या सायकलचं चाक अचानक निघून जातं, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतरही तो मुलगा सायकल थांबवत नाही आणि पुढे जात राहतो (Stunt on Cycle). VIDEO - पळव पळव पळवलं आणि शेवटी...; चवताळलेल्या उंटाने मारकुट्या मालकाचा घेतला खतरनाक बदला स्टंट ही एक अशी कला आहे, जी लहान मुलांचा खेळ नाही, असं तुम्ही अनेकदा लोकांकडून ऐकलं असेल. कारण त्यासाठी खूप मेहनत आणि सराव तसंच काळजी घ्यावी लागते. मात्र जर एखाद्या लहान मुलाने व्यवस्थित सराव केला तर तोही स्टंट करू शकतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ याचंच उदाहरण आहे. ज्यात एक मुलगा सायकलवर खास पद्धतीने आपलं कौशल्य सादर करत आहे.
    व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक मुलगा रस्त्यावर सायकल चालवत आहे. यादरम्यान त्याच्या सायकलचा मागचा टायर अचानक निघून जातो आणि सायकल फक्त एका चाकावर टिकून राहते. तरीही हा मुलगा सायकल अगदी व्यवस्थितपणे बॅलन्स करतो. चाक निघाल्यानंतरही तो सायकल चालवणं थांबवत नाही आणि सायकल चालवणं सुरूच ठेवतो. या मुलाचं टॅलेंट पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. या क्लिपमधील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी मुलाने हेल्मेटशिवाय इतर कोणतंही सेफ्टी किट घातलेलं नाही. स्टंट करताना चुकूनही काही गडबड झाली असती, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. वेडिंग पार्टीत नवरदेवाच्या मित्राचं धक्कादायक कृत्य; पाहून नवरीही भडकली, Shocking Video हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nautretallent नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. एका यूजरने लिहिलं की, "हा स्टंट करण्यासाठी त्या व्यक्तीने अनेक वर्षे मेहनत केली असावी. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'हा एक उत्तम स्टंट आहे.' आणखी एकाने याला अप्रतिम टॅलेंट म्हटलं आहे. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Stunt video

    पुढील बातम्या