• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • भल्यामोठ्या कोब्राला हातात घेऊन तरुणाचा डान्स; VIDEO पाहून डोळ्यांवर नाही बसणार विश्वास

भल्यामोठ्या कोब्राला हातात घेऊन तरुणाचा डान्स; VIDEO पाहून डोळ्यांवर नाही बसणार विश्वास

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मुलगा भल्यामोठ्या ब्लॅक कोब्राजवळ बसलेला आहे. तर दोन लहान मुलं शेजारीच असलेल्या दरवाजाजवळ उभा आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. अनेक लोक तर आपल्या फोटो आणि व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात टाकतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक तरुण भल्यामोठ्या कोब्रासोबत डान्स करत आहे (Boy Dancing with Black Cobra). हा मुलगा ज्यापद्धतीनं कोब्रा साप हातात घेऊन डान्स करतो, ते हैराण करणारं आहे. व्यावसायिकाने कचऱ्यात फेकले 16 लाख रूपये; चूक समजताच केला पोलिसांना फोन पण... व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मुलगा भल्यामोठ्या ब्लॅक कोब्राजवळ बसलेला आहे. तर दोन लहान मुलं शेजारीच असलेल्या दरवाजाजवळ उभा आहेत. यादरम्यान हा मुलगा अशाप्रकारे कोब्राला हातात घेऊन त्याच्यासोबत डान्स करतो, जणू हा साप म्हणजे एखादं खेळणं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोब्रा अतिशय़ भयानक दिसत आहे. मात्र या मुलाला त्याची अजिबातही भीती नाही. तो अगदी आरामात या कोब्रासोबत डान्स करत आहे. विशेष बाब म्हणजे कोब्रानंही या मुलाला काहीही केलं नाही. कारण इतका मोठा कोब्रा तर काही क्षणातच एखाद्यावर हल्ला करू शकतो.
  हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर helicopter_yatra_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 24 ऑक्टोबर रोजी शेअर झालेला हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. आतापर्यंत 1 लाख 77 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. जंगल सफारीसाठी गेलेल्या तरुणाला ती चूक भोवली; कोब्राने घेतला गुप्तांगाला चावा एका यूजरनं या व्हिडिओवर कमेंट करत विचारलं की हा मुलगा यानंतरही जिवंत आहे की नाही? तर दुसऱ्या एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसन नाहीये. आणखी एकानं लिहिलं, हा एकप्रकारचा वेडेपणा आहे. सापाने चावा घेतल्यास काहीच उरणार नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: