भुंकणाऱ्या कुत्र्यांसमोर चिमुकल्यानं केला चक्क भांगडा, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

भुंकणाऱ्या कुत्र्यांसमोर चिमुकल्यानं केला चक्क भांगडा, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

दिपांशु काब्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत 12 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : बऱ्याचदा अनेक संकट आपल्या समोर आली की आपण डगमगून जातो पण त्या संकटांमध्येही काहीतरी आधार असतो कुठेतरी आशेचा किरण असतो याचा विसर आपल्याला पडतो. सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकला भन्नाट डान्स करताना दिसत आहे. समोर संकट असतानाही हा चिमुकला डान्स करण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन कुत्रे या मुलावर खूप जोरात भुंकत आहेत आणि हा मुलगा मस्त नाचत आहे. हा चिमुकला डान्स करायचा थांबला की कुत्रे भुंकायचे थांबतात. या कुत्रांसमोर चिमुकला डान्स करण्याची मजा घेत आहे.

हे वाचा-कचऱ्यानं भरलेल्या ट्रकवर चढलं अस्वल, PHOTOS काढणाऱ्यांना दिले भन्नाट एक्स्प्रेशन

दिपांशु काब्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत 12 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे, समस्या कितीही कठीण असली तरी अशा परिस्थितीत बिनधास्त कसं राहायचं ते या मुलाकडून शिकावं. अनेकदा लहान मुलं किंवा मोठेही अनेकदा दरवाजा असूनही खूप घाबरतात. कोणत्याही परिस्थितीत जगताना आपल्याला आनंदी राहता यायला हवं.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन मुलं सायकलवरून जात असताना एका घराच्या बाहेर गेटवर कुत्रे भुंकायला लागतात. त्यांना पाहून चिमुकला नाचायला लागतो. हा मुलगा नाचायचा थांबला की कुत्रेही भुंकायला लागतात. त्याच्यासोबत असणारा दुसरा मुलगा पाहात राहतो. या व्हिडीओवर 65 युझर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 5, 2020, 9:42 AM IST

ताज्या बातम्या