व्हिडीओत पाहू शकता या विद्यार्थ्याने कॉपीसाठी चक्क पैशांच्या नोटांचाच वापर केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे माहिती नाही. पण भुतनी के मिम्स इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा -Alexa सर्वकाही...; आजीबाईची सूचना ऐकून अॅलेक्साही कन्फ्युझ; पाहा मजेशीर VIDEO विद्यार्थ्याने दहा-वीस रुपयांच्या नोटांवर कॉपी करून आणली. दहा रुपयांच्या दोन आणि वीस रुपयांच्या दोन नोटा आहेत. दहा रुपयांच्या आणि वीस रुपयांच्या या दोन्ही नोटा प्रत्येकी एकमेकांना चिकटवल्या आहेत. आणि त्यांच्या मागे कॉपी लिहिलेली आहे. व्हिडीओत शिक्षिकेचा आवाजही ऐकू येत आहे. शिक्षिक म्हणते. या मुलाने आपल्या परीक्षेसाठी 60 रुपये वाया घालवले. पण यावर 50 मार्क्सचा पेपर आहे. हे वाचा - रातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सही शॉक झाले आहेत. व्हिडीओ पाहून एका युझरने कमेंट केली आहे. अशा मुलांना पकडण्यासाठी स्पेशन 26 स्कॉ़ बोलवावं लागेल, असं म्हटलं आहे. तर एका युझरने इतकी मेहनत त्याने अभ्यासात घेतली असती तर टॉप केलं असतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Viral, Viral videos