Home /News /viral /

Amazing! काय तो नेम; तरुणाचा Archery skill video पाहून IPS अधिकारीही थक्क झाले

Amazing! काय तो नेम; तरुणाचा Archery skill video पाहून IPS अधिकारीही थक्क झाले

तरुणाचं तिरंदाजी कौशल्य पाहून तोंडात बोटं घालाल

    मुंबई, 02 डिसेंबर : तिरंदाजी (Archery) म्हटली की आपल्यासमोर एकलव्य, अर्जुन, करण. सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून यांना आजही ओळखलं जातं (Archery video) . आता तिरंदाजीच्या स्पर्धाही होत असतात (Archery skill). ज्यामध्ये किती तरी लोक आपलं तिरंदाजीचं कौशल्य दाखवतात. सध्या सोशल मीडियावर एका अशा तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याचं आर्चरी स्किल पाहून आयपीएस अधिकारीही थक्क झाले आहेत. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या तरुणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तरुण वेगवेगळ्या पद्धतीने तिरंदाजी करताना दिसतो. अशी तिरंदाजी तुम्हीही कधी पाहिली नसावी. व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला हा तरुण हवेत उडणाऱ्या एका वस्तूवर निशाणा साधताना दिसतो. पण त्यातही महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या लक्ष्याकडे पाहत नाही. म्हणजे सामान्यपणे नेम साधताना एका डोळ्याने पाहून तो साधला जातो. पण हा तरुण आपली मानच मागे वळवतो आणि न पाहतात अगदी अचूक निशाणा साधतो. यासोबतच तो हवेत हलत्या वस्तूवर, पाण्यातील फुग्यांवरही एकाच फटक्यात बाण मारताना दिसतो. हे वाचा - या व्यक्तीने दिली इतकी मोठी ढेकर की झाला World Record; आवाज ऐकूनच हादराल तरुणाचं हे टॅलेंट पाहून रुपिन शर्माही इम्प्रेस झाले आहेत. त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना हा करण की अर्जुन? हे तुम्ही ठरवा. असं कॅप्शनही दिलं आहे. त्यावर नेटिझन्सच्या कमेंट येत आहेत. याआधी उद्योगपती हर्ष गोयंका यांनीसुद्धा अशाच एका तिरंदाजीचा व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात एक तरुणी पायाने तिरंदाजी करताना दिसली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की ही तरुणी लोखंडाच्या रॉडवर हात ठेवून उभा राहते. तिच्या पायात धनुष्यबाण आहे. यानंतर ती जळणारा बाण यात अडकवून अचूक निशाणा साधते. हे वाचा - OMG! तळहाताच्या मागील बाजूवर ठेवली इतकी अंडी की बनवलं वर्ल्ड रेकॉर्ड,अनोखा VIDEO या तरुणीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. कारण लोखंडाच्या रॉडवर बॅलन्स बनवून तरुणीनं ज्या पद्धतीनं अचूक निशाणा साधला आहे, ते सर्वांनाच शक्य नाही. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sports, Viral, Viral videos

    पुढील बातम्या