Home /News /viral /

आयडियाची कल्पना! भंगारातून केवळ 100 रुपयांत खरेदी केलं विमान, आता त्यातूनच करतोय कोट्यवधींची कमाई

आयडियाची कल्पना! भंगारातून केवळ 100 रुपयांत खरेदी केलं विमान, आता त्यातूनच करतोय कोट्यवधींची कमाई

एका व्यक्तीने भंगार झालेलं विमान ब्रिटिश एअरलाइन्सकडून (British Airlines) अवघ्या 100 रुपयांमध्ये खरेदी करून त्याचं रुप पूर्णपणे बदलून टाकलंय.

नवी दिल्ली, 25 जानेवारी : एखादी वस्तू जुनी झाली की अनेकांसाठी ती निरुपयोगी ठरते. त्यामुळे एक तर ती वस्तू भंगारात (Waste) विकून जागा वाचवली जाते किंवा तशीच कोणत्याच कामात न घेता पडून राहते. पण सध्या वेस्टमधून बेस्ट (Best From Waste) तयार करण्याचा ट्रेंड आहे. असे अनेक लोक आहेत, जे भंगारातील निरुपयोगी वस्तू विकत घेत त्याला रिनोवेट करतात आणि त्याचा वापर करतात. काही लोक तर या कामात इतके पारंगत झाले आहेत की ते जुन्या वस्तू अगदी स्वस्तात घेऊन त्याला रिनोवेट (Renovate) करून खूप पैसा (Money) कमवतात. अशाच पद्धतीने एक विमान (Plane) तयार करण्यात आलं आहे. एका व्यक्तीने भंगार झालेलं विमान ब्रिटिश एअरलाइन्सकडून (British Airlines) अवघ्या 100 रुपयांमध्ये खरेदी करून त्याचं रुप पूर्णपणे बदलून टाकलंय. या भंगार झालेल्या विमानाचे बार आणि पार्टी प्लेसमध्ये (Bar And Party Place) रूपांतर करण्यात आले आहे. अनेकांचं विमान प्रवासाचं स्वप्न असतं. लोकांना त्यांचा विमानप्रवास मजेदार आणि आठवणीत राहील, असा करायचा असतो. अशा लोकांसाठी तर हे विमान जणू स्वर्गच आहे. 'द सन'च्या बातमीनुसार, भंगार झालेल्या विमानाचं रुप बदलून पैसे कमवण्याची ही भन्नाट आयडिया सुझाना हार्वे नावाच्या व्यक्तीला सुचली. मग त्याने हे रिटायर आणि भंगारमध्ये पडून असलेलं विमान खरेदी केलं. हे विमान त्याने 2020 मध्ये खरेदी केलं. त्यासाठी त्याने फक्त एक पौंड म्हणजेच 100 रुपये दिले होते. त्यानंतर त्या विमानाला आलिशान बार आणि पार्टी प्लेसमध्ये रूपांतर करण्यासाठी त्यावर तब्बल 5 कोटी रुपये खर्च केले. आता त्याच विमानाच्या माध्यमातून तो कोट्यवधी रुपये कमवत आहे.

हे वाचा - ‘या’ मॉडेलचं वय काय असेल? 95 टक्के लोकांनी दिलंय चुकीचं उत्तर

ज्या लोकांना विमानात पार्टी (Party In Flight) करण्याची आवड असते ते लोक हे विमान भाड्याने (Rent) घेतात. या विमानाचं भाडं ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण हार्वे विमानातील या बारमध्ये पार्टी करण्यासाठी एका तासाचे 1 लाख रुपये भाडं घेतो. त्याचा हा व्यवसाय अगदी जोमाने सुरू आहे. आपल्याला जरी ही रक्कम मोठी वाटत असली तरी विमानात पार्टी करणारे असे खूप लोक आहेत, जे एवढे पैसे खर्च करून हे विमान बूक करतात.

हे वाचा - वाहतूक कोंडीत अडकलेल्या चालकाचं सार्वजनिक ठिकाणीच अजब कृत्य; पाहून शॉक झाले लोक

या विमानात वाढदिवसापासून ते कॉर्पोरेट (Corporate) आणि प्रॉडक्ट लॉन्चिंग पार्ट्या (Product Launching Party) आयोजित केल्या जातात. हे आलिशान विमान सर्व सुखसोयींनी सज्ज आहे. तसेच आतून खूप छान डेकोरेट करण्यात आलंय. आतून तर हे विमान असल्याचं तुम्हाला जाणवणार पण नाही. ब्रिटिश एअरवेजचे हे विमान 1994 मध्ये एअरलाइनमध्ये समाविष्ट केले गेले होते. त्यानंतर 26 वर्षांनी एप्रिल 2020 मध्ये त्याने शेवटचे उड्डाण केले होते. रिटायर झालेलं हे विमान हार्वेने खरेदी केलं आणि त्यातून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतोय.
First published:

Tags: Airplane

पुढील बातम्या