मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तुम्ही म्हणाल असा बॉस सर्वांना मिळो! 63 लाखांचं पॅकेज अन् वर्क फ्रॉम होमचं स्वातंत्र्य

तुम्ही म्हणाल असा बॉस सर्वांना मिळो! 63 लाखांचं पॅकेज अन् वर्क फ्रॉम होमचं स्वातंत्र्य

काही क्षेत्रांमध्ये लाखो रुपये पगार मिळतो

काही क्षेत्रांमध्ये लाखो रुपये पगार मिळतो

अमेरिकेतील एका मोठ्या मनाच्या बॉसची कहाणी सध्या व्हायरल होत आहे. ग्रॅविटी पेमेंट्स नावाची कंपनी चालवणारे डॅन प्राइस त्यांच्या कर्मचार्‍यांना दरवर्षी किमान 63.7 लाख रुपये पगार देतात.

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : एखाद्या कंपनीच्या (Company) यशामागे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या (Employees) मेहनतीचा मोठा हात असतो. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आणि बॉसकडून काही अपेक्षा असतात, ज्या कधी न सांगता पूर्ण होतात, तर कधी त्यांना निराश व्हावं लागतं. सध्या अमेरिकेतल्या (America) एका बॉसची (Boss) जोरदार चर्चा होत आहे. या बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना भरपूर सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे त्याला जगातला सर्वोत्तम बॉस म्हटलं जात आहे. अमेरिकेतल्या एका मोठ्या मनाच्या बॉसची कहाणी सध्या खूप व्हायरल होत आहे. ग्रॅव्हिटी पेमेंट्स (Gravity Payments) नावाची कंपनी चालवणारे डॅन प्राइस (Dan Price), त्यांच्या कर्मचाऱ्यांना किमान 80,000 अमेरिकी डॉलर म्हणजेच वार्षिक 63.7 लाख रुपये पगार (Salary) देतात. प्रत्येकानं हे करावं अशी त्यांची इच्छा आहे. याशिवाय ते आपल्या कर्मचाऱ्यांना अशा काही सुविधा देतात, ज्याचा विचारही अन्य कंपन्यांनी केला नसेल. मागच्या वर्षीदेखील प्राइस एका हटके कारणामुळे जोरदार चर्चेत आले होते. त्या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी स्वतःचं दुसरं घर विकलं होतं. या राशीला आज होणार आर्थिक लाभ; आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीत काय आहे पाहा घरी बसून काम करा; मिळेल 63 लाख रुपयांचं पॅकेज स्वतः डॅन प्राइस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही गोष्ट शेअर केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, `माझी कंपनी कर्मचाऱ्यांना किमान 80,000 अमेरिकी डॉलर्सचं पॅकेज देते. तसंच मी त्यांना कुठूनही काम करण्याच्या स्वातंत्र्यासह संपूर्ण सुविधा देतो. कर्मचाऱ्यांना पगारी पितृत्व रजा मिळते. आमच्याकडे एका पदासाठी नोकरीचे 300 हून अधिक अर्ज येतात. कोणीही नरकात काम करू इच्छित नाही. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन आणि सन्मान देत नाहीत,` असं प्राइस यांनी सांगितलं. त्यांनी ही पोस्ट इन्स्टाग्रामवरही (Instagram) शेअर केली असून, यामुळे योग्य पगारावरून वादाला तोंड फुटलं आहे. घर विकून वाढवलाय कर्मचाऱ्यांचा पगार 31 वर्षांचे डॅन ग्रॅव्हिटी पेमेंट्स नावानं एक क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग कंपनी (Credit Card Processing Company) चालवतात. यापूर्वी 2021 मध्ये ते जोरदार चर्चेत आले होते. त्या वेळी त्यांनी एक मोठा निर्णय घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार 51 लाख रुपयांवर नेला. यासाठी त्यांनी त्यांच्या पगारात 7 कोटींची कपात केली होती. एवढंच नाही, तर त्यांनी आपलं दुसरं घरही विकलं. यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी कर्मचाऱ्यांचा किमान पगार 51 लाख रुपये केला होता. सध्या त्यांचा पगार त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांइतका आहे. त्यांच्या या निर्णयावर खूप टीका झाली; पण ही बाब योग्य असल्याचं ते मानतात.
First published:

Tags: Salary

पुढील बातम्या